News Flash

एकल पालकत्वावरुन ट्रोल करणाऱ्यांना करणचं सडेतोड उत्तर

ट्रोलर्सने करणच्या मुलांवर चर्चा सुरु केल्यानंतर त्याच्या संयमाचा बांध फुटला

करण जोहर, यश, रुही

बॉलीवूडमधील निर्माता करण जोहर ७ फेब्रुवारी २०१७ रोजी जुळ्या मुलांचा पिता झाला आहे. करण जोहरला सरोगसीच्या माध्यमातून पुत्र आणि कन्यारत्नाची प्राप्ती झाली.मात्र या दोन्ही मुलांचं एकल पालकत्व स्वीकारणाऱ्या करणला अनेकांनी ट्रोल केलं. या ट्रेलर्सला करणने सडेतोड शब्दात उत्तर दिलं आहे.

करण वरचेवर सोशल मीडियावर आपल्या दोन्ही मुलांसोबतचे फोटो शेअर करत असतो. विशेष म्हणजे करण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ट्रोल होत असतो. याविषयी त्याने त्याच्या कार्यक्रमामध्ये त्याचं मतही मांडलं होतं. अनेक वेळा ट्रोल होणाऱ्या करणने आतापर्यंत ट्रोलर्सला शांतपणे उत्तर दिलं आहे. मात्र नेटकऱ्यांनी करणच्या मुलांवर चर्चा सुरु केल्यानंतर करणने त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

देशामध्ये सध्या चर्चा करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यावर खरंतर चर्चा करायला हवी. पण काही जण असे असतात ज्यांना लहानसहान गोष्टींवर उगाचच चर्चा करायला आवडते. मुळात हा त्यांचा दोष नाही. हा दोष त्यांच्या संकुचित विचारसरणीचा आहे, असं करण म्हणाला.

पुढे तो असंही म्हणाला, माझी मुलं माझ्यासाठी सर्वस्व आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही गोष्टीची उणीव भासणार नाही याकडे माझं कायम लक्ष असतं. खास करुन जर तुम्हाला वाटत असेल की मुलांना आईच प्रेम मिळत नाहीये. तर हा तुमचा गैरसमज आहे. माझी आईच माझ्या मुलांची आई आहे. त्यामुळे माझ्या दोन्ही मुलांना आईचं प्रेम मिळतंय.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 11:58 am

Web Title: karan johar reply to trollers karan johar kids
Next Stories
1 …म्हणून कार्तिकनं नाकारली १० कोटींची ऑफर
2 Photo : ‘सांड की आँख’ मध्ये पुन्हा एकदा प्रकाश झा यांचा अभिनय
3 ‘या’ वेबसीरिजमधून करिश्मा करणार कमबॅक
Just Now!
X