27 September 2020

News Flash

…म्हणून करण जोहर रणबीर कपूरला करणार ब्लॉक

केजोला सोशल मीडियाशी संबंधीत काही प्रश्न विचारण्यात आले होते

करण जोहर

बॉलिवूडमध्ये सध्याचा यशस्वी दिग्दर्शक, अभिनेता, आरजे, लेखक आणि प्रसिद्ध शोचा सूत्रसंचालक म्हणून करण जोहर ओळखला जातो. कार्यक्रमाची सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडणाऱ्या करणला त्याच्याच कार्यक्रमामध्ये काही खासगी आणि व्यावसायिक जीवनातील प्रश्न विचारण्यात आले. विशेष म्हणजे या प्रश्नांची त्याने दिलखुलासपणे उत्तरही दिली. याचवेळी करणला सोशल मीडियाशी संबंधीत काही प्रश्न विचारण्यात आले होते, त्यावर करणने त्याच्या खास शैलीत प्रश्नांची उत्तर दिली.

करणला सिद्धार्थ मल्होत्रा, रणबीर कपूर आणि वरुण धवन यांच्या वरून कोड घालण्यात आले होते. त्यामध्ये करण जोहर सोशल मीडियावर कोणाला फॉलो करणार, कोणाला अनफॉलो करणार आणि कोणाला ब्लॉक करणार असे विचारण्यात आले होते. हे ऐकताच करण विचारात पडला आणि थोडा वेळ घेऊन मग म्हणाला, ‘मी रणबीरला ब्लॉक करेन कारण तो सोशल मीडियावर नाही, त्यानंतर मी वरुणला अनफॉलो करेन कारण वरुन मला फॉलो करत असतो. त्याच्या आयुष्यात काय सुरू आहे हे मला माहित असते आणि माझ्या आयुष्यात काय सुरू आहे हे त्याला माहिती असते. आमचे रोज बोलणे होते. आता राहिला सिद्धार्थ मल्होत्रा. मी त्याला फॉलो करेन’ असे  विचारपूर्वक उत्तर दिले आहे.

वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी करण जोहरच्या ‘स्टूडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सध्या करण ‘बह्मास्त्र’ आणि ‘कलंक’ चित्रपटांच्या निर्मितीमध्ये व्यग्र आहे. करणच्या ‘कलंक’ चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट, वरूण धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा अशी तगडी स्टार कास्ट असून येत्या १७ एप्रिला हा चित्रपट प्रदर्शित होणारआहे. तर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2019 12:02 pm

Web Title: karan johar reveals why he will block ranbir kapoor on social media
Next Stories
1 जेव्हा कलाकारांनी अॅडल्ट कॉमेडी करण्यास दिला होता नकार; वाचा ‘अमेरिकन पाय’चा रंजक किस्सा
2 Video : ‘त्या’ गाण्याने केली कमाल! प्रभुदेवाला म्हणू लागले ‘भारताचा मायकल जॅक्सन’
3 जयाप्रदा यांच्या सुप्रसिद्ध ‘डफली वाले’ गाण्याचा हा मजेशीर किस्सा माहितीये का?
Just Now!
X