29 January 2020

News Flash

‘स्वत:वर The Gay नावाचा चित्रपट बनव’, म्हणणाऱ्याला करणचं सडेतोड उत्तर

करणला स्वत:च्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचा सल्ला देत त्या चित्रपटाचं नाव 'द गे' (The Gay) असं ठेवावं असं त्या ट्विटर युझरने ट्विट केलं होतं.

करण जोहर

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर अनेकदा त्याच्या लैंगिकतेमुळे चर्चेत राहिला आहे. याच विषयावरून ट्विट करणं एका युझरला महागात पडलं आहे. कारण लैंगिकतेवरून ट्रोल करणाऱ्याला करण जोहरने सडेतोड उत्तर दिलं आहे.

करणला स्वत:च्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचा सल्ला देत त्या चित्रपटाचं नाव ‘द गे’ (The Gay) असं ठेवावं असं त्या ट्विटर युझरने ट्विट केलं होतं. ट्रोलरचं ट्विट रिट्विट करत करणने लिहिलं की, ‘तू खंरच खूप अभ्यासू आहेस. इतके दिवस कुठे लपून बसला होतास? आज ट्विटरवर सर्वांत योग्य मुद्दा उचलल्यामुळे मी तुझे आभार मानतो.’ करणच्या या उत्तरानंतर नेटकऱ्यांनीही त्या युझरवर टीकांचा भडीमार केला. यानंतर संबंधित युझरने त्याचं ट्विट डिलीट केलं.

सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगला मजेशीररित्या कसं घ्यावं हे शिकल्याचं करणने अरबाज खानच्या शोमध्ये म्हटलं होतं. ”सुरुवातीला ट्रोल करणाऱ्यांचा मला फार राग यायचा. पण आता त्या गोष्टी मी मजेशीररित्या घेऊ लागलो आहे,” असं तो म्हणाला होता.

करणच्या चित्रपटांबाबत बोलायचे झाल्यास, त्याचा ‘कलंक’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटला होता. तगडी स्टारकास्ट असतानाही हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. त्यानंतर प्रदर्शित झालेला ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटानेसुद्धा जेमतेम कमाई केली. आता पुढच्या वर्षी त्याचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांसारखे कलाकार आहेत.

First Published on August 19, 2019 11:07 am

Web Title: karan johar shut down troll who tweeted his biopic should be titled the gay ssv 92
Next Stories
1 “हो, आहे मी पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचा एजंट”; पाकिस्तानी अभिनेत्याची कबुली
2 ही अभिनेत्री म्हणते “सलमान खान करणार माझ्याशी लग्न”
3 ‘मिशन मंगल’च्या पोस्टरवर अक्षयला महत्त्व, तिस्का म्हणते…
Just Now!
X