20 October 2020

News Flash

बिग बींना पहिल्यांदा पाहून करण जोहर झाला होता बेशुद्ध

मला पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांच्यासह काम करण्याची संधी मिळाली होती

करण जोहर

दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कभी खूशी कभी गम’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर काही वेगळीच जादू केली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, हृतिक रोशन, करिना कपूर आणि काजोल हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष गाजला होता. तसेच या चित्रपटामुळे सर्व कलाकरांच्या करिअरला एक वेगळेच वळण मिळाले होते. दरम्यान या चित्रपटातील गाण्यात बिग बींना पाहून करण जोहर बेशुद्ध झाला असल्याचा खुलासा करण जोहरने केला आहे.

‘कभी खूशी कभी गम’ या चित्रपटातील ‘बोले चूडिया’ या गाण्याने आज यूट्यूबवर ४०० मिलियन व्ह्यूज पार केले आहेत. दरम्यान करणने चित्रपटाबाबत ट्विट करत आठणींना उजाळा दिला आहे. अमिताभ यांना पहिल्यांदा पाहून करण जोहर बेशुद्ध झाला होता. ‘माझ्या करिअरमधील सर्वात अविस्मरणीय गाणे. मला पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांच्यासह काम करण्याची संधी मिळाली होती. मी त्यांना पाहून घाबरलो होतो. इतका घाबरलो की बेशुद्धच झालो होतो’ असे करणने ट्विटमध्ये लिहिले होते.

‘कभी खूशी कभी गम’ हा चित्रपट २००१मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरचे वडिल यश जोहर यांनी केली होती. या चित्रपटाला ५ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. आजही हा चित्रपट प्रेक्षक तितक्याच आनंदाने पाहत असून चित्रपटातील गाणी तितकीच लोकप्रिय आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 7:24 pm

Web Title: karan johar talks about first time work with amitabh bachan avb 95
Next Stories
1 अरोह वेलणकरला आहे तालिम व्‍यायामाचे अप्रूप
2 तेलुगू चित्रपटातून आर्यन खानचं पदार्पण; प्रभास, राणा डग्गुबत्तीसोबत करणार काम?
3 इंटरनेटवर मंदिरा बेदीच्या ‘त्या’ फोटोने खळबळ, चाहते झाले घायाळ
Just Now!
X