21 September 2018

News Flash

प्रेमात अपयशी ठरताय…. मग करणला संपर्क साधा!

त्याने आजवर अनेकांच्या जोड्या जमवून दिल्या आहेत.

करण जोहर

करण जोहरला एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हटलं तरी चुकीचे ठरणार नाही. दिग्दर्शक, निर्माता, लेखक, अभिनेता, सूत्रसंचालक अशा विविध भूमिका त्याने आजवर साकारल्या आहेत. ‘कॉफी विथ करण’ हा चॅट शो आणि अनेक पुरस्कार सोहळ्यांचे सूत्रसंचालन करणारा करण आता ‘लव्ह गुरु’ होण्यासाठी सज्ज झाला आहे.

HOT DEALS
  • BRANDSDADDY BD MAGIC Plus 16 GB (Black)
    ₹ 16199 MRP ₹ 16999 -5%
    ₹1620 Cashback
  • Gionee X1 16GB Gold
    ₹ 8990 MRP ₹ 10349 -13%
    ₹1349 Cashback

VIDEO : आराध्यासह ऐश्वर्या-अभिषेक भांगडा करतात तेव्हा..

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूडचा हा प्रसिद्ध दिग्दर्शक एका रेडिओ स्टेशनवर नातेसंबंधाविषयीचे सल्ले देणार आहे. ‘कॉलिंग करण’ असे या शोचे नाव असणार असून, पुढच्या महिन्यापासून तो ‘ऑन एअर’ जाईल. खरंतर लव्ह गुरुची भूमिका करण अतिशय उत्तमरित्या वठवेल यात तिळमात्र शंका नाही. कारण, त्याने आजवर अनेकांच्या जोड्या जमवून दिल्या आहेत. तसेच, ब्रेकअप झालेल्यांचे पॅचअप करण्यासाठीही तो महत्त्वाची भूमिका साकारतो. ताजे उदाहरण द्यायचे झालेच तर अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेत्री सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यामध्येही त्यानेच पॅचअप करून दिल्याचे कळते. त्यामुळे, प्रेमात अपयशी असलेल्यांसाठी करणचा रेडिओ शो नक्कीच तारणहार ठरू शकतो.

PHOTO :… असा होता प्रार्थना बेहरेच्या लग्नातील हळद आणि मेहंदी कार्यक्रम

एकीकडे तो या रेडिओ शोची तयारी करत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे करणची निर्मिती आणि सोनाक्षी सिन्हा, सिद्धार्थ मल्होत्रा, अक्षय खन्नाची मुख्य भूमिका असलेला ‘इत्तेफाक’ चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. विविध प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र असणारा करण येत्या काळात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

First Published on November 14, 2017 2:00 pm

Web Title: karan johar to become rj love guru on a radio show