News Flash

सोशल मीडियावरूनही करणने कार्तिकचा पत्ता कट केला , इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो

सोशल मीडियावर चर्चा

करण जोहरच्या ‘दोस्ताना -2’ मधून कार्तिक आर्यनला काढून टाकण्यात आल्याची बातमी सध्या चांगलीच चर्चेत आहे. ‘दोस्ताना -2’ या चित्रपटाची घोषणा २०१८ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर या चित्रपटात कार्तिक आणि अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असे सांगण्यात आले होते. पण आता कार्तिकच्या ऐवजी दुसऱ्या एका अभिनेत्याला मुख्य भूमिकेत घेतले असल्याचे समोर आले आहे.

त्यानंतर आता करण आणि कार्तिकमध्ये फूट पडल्याचं दिसू लागलं आहे. एका वृत्तानुसार करणने कार्तिक आर्यनला सोशल मीडियावर देखील अनफॉलो केलं आहे. कार्तिकला ‘दोस्ताना २’ च्या अर्धी स्क्रिप्ट आवडली नव्हती त्यामुळे करण जोहरने कार्तिकच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याची निवड केली आहे. यानंतर करणने त्याच्या इन्स्टाग्राम लिस्टमधून कार्तिकला अनफॉल केल्याचं वृत्त समोर आलं आहे. असं असलं तरी कार्तिक अजूनही करणला सोशल मीडियावर फॉलो करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिकने ‘दोस्ताना 2’ सिनेमाचं चित्रीकरण सुरु केले होतं. २० दिवसांचे चित्रीकरण झाल्यानंतर त्याने पुढील डेट्स देण्यास नकार दिला होता. सध्या कार्तिककडे अनेक प्रोजक्ट्स असल्यामुळे तो कामात व्यग्र आहे.

धर्मा प्रोडक्शनने एक नोट जारी केली आहे. यात कलाकारांविषयी अधिकृत घोषणा करण्यात आलीय. यात “व्यावसायिक कारणास्तव आम्ही दोस्ताना-2 या सिनेमाची रिकास्टिंग करणार आहोत. अधिकृत घोषणेसाठी प्रतिक्षा करा.” असं सांगण्यात आलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 2:42 pm

Web Title: karan johar unfollow kartik aaryan on instagram after dostana 2 clashes kpw 89
Next Stories
1 सर्वसामान्यांना बळ देणारा अभिनेता सोनू सूद करोना पॉझिटिव्ह
2 “मराठी सिनेमाच्या स्क्रीनसाठी भिका मागाव्या लागतात, ही लांछनास्पद गोष्ट”, प्रसाद ओकने व्यक्त केली खंत
3 दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याणला झाला करोना
Just Now!
X