08 March 2021

News Flash

या कारणामुळे करण जोहर करणार होता एकता कपूरशी लग्न

एका मुलाखतीमध्ये त्याने हे वक्तव्य केले होते.

एकता कपूर आणि करण जोहर ही दोन्ही बॉलिवूडमधील लोकप्रिय नावे आहेत. करणने आजवर अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे तर एकताने छोट्या पडद्यावरील अनेक हिट मालिकांची निर्मिती केली आहे. ते दोघे ही आज यशस्वी निर्मात्यांच्या यादीमध्ये गणले जातात. तसेच एकता कपूर आणि करण जोहर या दोघांमध्ये चांगले मैत्रीचे नाते देखील आहे. पण काही दिवसांपूर्वी ते दोघे लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते.

करण जोहरने एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला होता. ‘जर मला आणि एकताला योग्य पार्टनर नाही मिळाले तर आम्ही दोघ लग्न करु. माझ्या आणि एकताच्या लग्नाने कोणी खुश झालं नाही झालं तरी माझ्या आईला नक्कीच आनंद होईल. कारण, जर मी एकताशी लग्न केले तर माझ्या आईला एकताच्या मालिकांमध्ये पुढे काय होणार हे आधीच माहिती होईल’ असे करण मजेशीर अंदाजात बोलला होता. त्याचे हे उत्तर ऐकून सर्वजांना हसू आले होते.

एकता आणि करण जोहर हे दोघेही खूप चांगले मित्र-मैत्रीण आहेत. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटोवर कमेंट करताना दिसत आहेत. नुकताच करणने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये त्याचे केस पांढरे झाल्याचे दिसत होते. त्यावर एकता कपूरने कमेंट करत ‘कसौटी जिंदगी के’ या मालिकेतील मिस्टर बजाजचा रोल करणला ऑफर केला होता. ‘माझी एक टीव्ही सीरिअल सुरु आहे. त्यातील मिस्टर ऋषभ बाजाज या पात्राचे केस पांढरे आहेत. आम्ही मालिकेतील चेहरे बदलतच असतो. तुला हवं तर तु प्लीज टीव्ही सीरिअलमध्ये ये’ असे तिने कमेंटमध्ये म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 12:50 pm

Web Title: karan johar was ready to marry ekta kapoor but avb 95
Next Stories
1 … म्हणून देवोलीनाला करण्यात आलं होम क्वारंटाईन
2 “बॉलिवूडमध्ये कोणीही जबरदस्ती करत नाही”; अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव
3 सात रुग्णालयांनी दाखल करुन घेण्यास दिला नकार; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
Just Now!
X