करोना व्हायरसमुळे संपूर्ण जग सध्या त्रस्त आहे. मात्र करोनाचा सर्वाधिक फटका बसला तो युरोप आणि अमेरिकेला. स्पेन आणि इटली या देशांमध्ये तर करोनाने जणू मृत्यूचा तांडवच सुरु केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या दोन देशांत आतापर्यंत १५ हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या गोष्टीचा सर्वाधिक फटका कुठल्या भारतीयाला बसला असेल तर तो आहे करण जोहर.

द क्विंटने दिलेल्या वृत्तानुसार बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर याने आपल्या ‘तख्त’ आणि ‘दोस्ताना २’ या आगामी चित्रपटांची तयारी खूपच जोरात सुरु केली होती. आश्चर्याची बाब म्हणजे या बिग बजेट चित्रपटांचे चित्रीकरण स्पेन आणि इटलीमध्ये होणार होते. यासाठी करणने आतापर्यंत कोट्यवधींची गुंतवणूक केली होती. मात्र करोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपामुळे करणच्या नियोजनाचे तीन तेरा वाजले आहेत. या देशांमधील परिस्थिती सामान्य होईपर्यंत इथे कुठल्याही चित्रपटांचे चित्रीकरण केले जाणार नाही असे आदेश तेथील सरकारने जारी केले आहेत. त्यामुळे ‘तख्त’ या चित्रपटाचं चित्रीकरण आता भारतातच केलं जाणार आहे.

quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?
Fishermen in Vasai are at risk of extinction
शहरबात: वसईतील मच्छिमार उध्दवस्त होण्याचा धोका
women murdered in Kenya
विश्लेषण : केनियात महिलांच्या इतक्या प्रमाणात हत्या का होताहेत? काय आहे ‘डार्क व्हॅलेंटाइन’ चळवळ?
people, blocked Chinchoti Kaman Bhiwandi road, protest
चिंचोटी कामण-भिवंडी रस्त्याची दुरावस्था, नागरिकांचे दोन तास रास्ता रोको 

‘तख्त’ हा करण जोहरचा आजवरचा सर्वात मोठा प्रकल्प आहे. हा चित्रपट ऐतिहासिक कथानकावर आधारित आहे. यामध्ये मुघलांची कथा दाखवण्यात येणार असून रणवीर सिंग आणि विकी कौशल भावंडांची भूमिका साकारणार आहेत. रणवीरच्या बहिणीच्या भूमिकेत करिना, तर त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत आलिया आहे. विशेष म्हणजे आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा विकी कौशल यामध्ये औरंगजेबच्या भूमिकेत असल्याची माहिती आहे.