प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरला अंमली पदार्थ विरोधी पथकानं (एनसीबी) समन्स बजावलं आहे. बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी करण जोहरकडून महत्वाची माहिती मिळते का? हे जाणून घेण्यासाठी एनसीबीने त्याला चौकशीसाठी बोलावलं. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना “माझ्या पार्टीत कुठल्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचं सेवन केलं गेलं नाही” असं तो म्हणाला.

अवश्य पाहा – “आंदोलनामुळे ७० हजार कोटींचं नुकसान होतंय”; कंगनाने केली शेतकऱ्यांवर टीका

हे प्रकरण काय आहे?

करण जोहरने गेल्या वर्षी आपल्या घरात एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, विकी कौशल, मलायका अरोरा यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांनी हजेरी लावली होती. या पार्टीमध्ये अंमली पदार्थांचं सेवन करण्यात आलं होतं असा आरोप माजी आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी केला होता. शिवाय त्यांनी करण विरोधात अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे तक्रार देखील केली होती. तसेच गेल्या काही काळात ड्रग्स घेणाऱ्या बॉलिवूड कलाकारांची नावं समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर एनसीबीने करण जोहर विरोधात समन्स जारी करुन त्याला चौकशीसाठी बोलावलं होतं. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार या चौकशीदरम्यान “मी ड्रग्स घेत नाही, अन् माझ्या कुठल्याही पार्टीमध्ये आजवर ड्रग्सचं सेवन केलं गेलेलं नाही.” असं स्पष्टीकरण करण जोहरनं दिलं.

अवश्य पाहा – अरे बापरे… ही अभिनेत्री एका फोटोशूटसाठी घेते २०० कोटी

अवश्य पाहा – ‘वंडर वुमन’चा ओपनिंग सीन पाहिलात का?; १३ वर्षीय अभिनेत्रीचे स्टंट पाहून तोंडात बोटे घालाल

या सेलिब्रिटींची झाली चौकशी

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात एनसीबीने आत्तापर्यंत ३० पेक्षा जास्त जणांना अटक केली आहे. तसंच रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, फिरोज नाडियादवाला, भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया, अर्जुन रामपाल यांसारख्या बड्या कलाकारांची चौकशी केली आहे.