News Flash

अनुषा दांडेकरच्या आरोपांवर करण कुंद्राने मौन सोडलं; म्हणाला “मी देखील…

ती पुढे गेलीय, मी नाही!

अभिनेता करण कुंद्रा आणि विजे अनुषा दांडेकर यांच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला होता . नुकतच अनुषाने सोशल मीडियावर चांहत्यांशी संवाद साधला. या सेशनमध्ये अनुषाने पुन्हा एकदा करणसोबतच्या ब्रेकअपवर खुलासा केला. करणने आपली फसवणूक केली शिवाय यासाठी त्याने माफी देखील मागितली नाही असं अनुषा या सेशनमध्ये म्हणाली होती.

यानंतर अभिनेता करण कुंद्राने अनुषाच्या आरोपांवर मौन सोडलं आहे. करणने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अनुषाने त्याच्यावर केलेल्या आरोपांवर भाष्य केलंय. तो म्हणाला, “मी आतापर्यंत फक्त आमच्या नात्याचा सन्मान करत गप्प बसलो. मी आमच्या दोघांच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा विचार केला. नाहीतर मी देखील खूप काही बोलू शकलो असतो. मात्र मी तसा नाहीय.” असं म्हणत करणने मौन सोडलं.

पुढे अनुषाच्या आरोपांवर बोलताना तो म्हणाला, ” ती जे काही म्हणाली ते तिचं मत होतं. मला माहित नाही कुणी एखाद्याचा इतका द्वेष कसा करू शकतं. आम्ही साडे तीन वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो. मी अनुषाकडून खुप काही शिकलो, तिचा आणि तिच्या कुटुंबियांचा मी आदर करतो. करिअरमध्ये पुढे जात असतानाच माझ्यावर गंभीर आरोप कसे काय केले जाऊ शकतात? या आधी मी ज्यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होतो त्यांनी कधी असे गंभीर आरोप लावले  नाही?” असे सवाल उपस्थित करत करणने खंत व्यक्त केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anusha Dandekar (@vjanusha)

ती पुढे गेलीय, मी नाही!

या मुलाखतीत करणने सध्या तो सिंगल असल्याचं सांगितलं. कुटुंबीय आणि मित्रांच्या मदतीने तो करिअरमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्याने सांगितलं. शिवाय, अनुषाच्या आरोपांमुळे खूप दु:ख झाल्याचं तो म्हणाला. सध्या कोणत्याच नात्यात अडकण्याची इच्छा नसल्याचं त्यांने सांगितलं. अनुषाने करणवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता. यावर तो म्हणाला, ” तिच्या मनात माझ्यासाठी थोडी जरी जागा असती तर तिने असं केलं नसतं. मी विचार करतोय जेव्हा आम्ही एकमेकांना दु:खी करणार नाही. आमच्यातील वाद संपतील तेव्हा मी बोलेन.मी अजून काही बोललो नाही याचा अर्थ मला त्रास झाला नाही असा असा होत नाही. अनुषा आयुष्यात पुढे गेलीय. मात्र मी नाही गेलो. ” असं म्हणत करणने त्याच्या मनातील सल व्यक्त केली.

करण जोहरच्या ‘दोस्ताना-2’मध्ये कार्तिक आर्यनच्या जागी ‘या’ अभिनेत्यांची एण्ट्री

करण सध्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 5:14 pm

Web Title: karan kundra break his silence on breakup with vj anusha dandekar kpw 89
Next Stories
1 ‘एक ते दोन महिन्यांमध्ये…’, दयाबेनच्या वापसीवर असित मोदींचा मोठा खुलासा
2 ‘द कपिल शर्मा’ शोमधील अभिनेत्रीने केला साखरपुडा
3 करण जोहरच्या ‘दोस्ताना-2’मध्ये कार्तिक आर्यनच्या जागी ‘या’ अभिनेत्यांची एण्ट्री
Just Now!
X