News Flash

“स्वप्नांच मरणं अत्यंत त्रासदायक असतं”; अभिनेत्रीच्या आत्महत्येवर करण कुंद्राची प्रतिक्रिया

क्राईम पेट्रोलमधील अभिनेत्रीने आत्महत्या केली.

प्रेक्षा मेहता, करण कुंद्रा

‘क्राईम पेट्रोल’ या प्रसिद्ध मालिकेत झळकलेली अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिने गळफास लावून आत्महत्या केली. गेल्या काही महिन्यांपासून तिच्याकडे काम नसल्यामुळे प्रेक्षा नैराश्यामध्ये होती. परिणामी तिने आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेवर अभिनेता करण कुंद्रा याने प्रतिक्रिया दिली आहे. स्वप्नांच मरणं हे अत्यंत त्रासदायक असतं. असं म्हणत त्याने प्रेक्षाला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

“स्वप्नांच मरणं हे अत्यंत त्रासदायक असतं. आणखी एका टीव्ही अभिनेत्रीने आत्महत्या केली. तू खुपच तरुण होतीस. तुझ्यासमोर संपूर्ण आयुष्य होतं. आपल्या मानसिक स्थितीबाबत आपण इतरांशी चर्चा करायला हवी.” अशा आशयाचं ट्विट करुन करणने श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.

प्रेक्षाने सोमवारी रात्री आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून काम बंद असल्यामुळे प्रेक्षा नैराश्यामध्ये गेल्याचे तिच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी प्रेक्षाने सोशल मीडियावर निराशाजनक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये तिने, ‘सर्वात वाईट असतं ते म्हणजे तुमची स्वप्न मरुन जाणं’ असे लिहिलं होतं. सकाळी जेव्हा तिचे वडिल उठले तेव्हा त्यांनी प्रेक्षाने आत्महत्या केल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी तातडीने प्रेक्षाला रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी तिचे निधन झाल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2020 1:16 pm

Web Title: karan kundra on crime patrol actress preksha mehtas suicide mppg 94
Next Stories
1 अभिनेत्री विद्या बालनचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण
2 “फोटोग्राफरने सलमानला मला किस करायला सांगितलं होतं, पण..”; भाग्यश्रीने सांगितला किस्सा
3 महाराष्ट्र पोलिसांच्या ट्विटवर आयुषमान खुरानाचं मराठीत उत्तर, म्हणतो…
Just Now!
X