News Flash

“करणचे विवाहबाह्य संबध”; गेल्या अनेक वर्षापासून अत्याचार सुरू असल्याचा नीशा रावलचा आरोप

'ये रिश्ता..' फेम अभिनेता करण मेहराच्या वैवाहिक जीवनातील वाद चव्हाट्यावर.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता करण मेहरा आणि त्याच्या पत्नीमधील वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. नीशा रावलच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी अभिनेता करण मेहराला अटक केली होती. त्यानंतर काही तासातंच करणची जामिनावर सुटका झाली. दरम्यान करणने पत्नी निशावर काही आरोप केल्यानंतर आता पुन्हा एकदा नीशाने करणवर नवे आरोप लावले आहेत.

नीशा रावलने करणवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर आता दोघांच्या भांडणासाठी करणचं अफेअर कारणीभूत असल्याचा खुलासा तिने केला आहे. करणचे विवाहबाह्य संबध असून यामुळे अनेक वर्षांपासून नात्यात तणाव आल्याचं ती म्हणाली आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नीशाने खळबळजनक खुलासा केला आहे. करण मुलाची म्हणजेच कविशची जबाबदारी घेण्यास तयार नसून गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यावर अत्याचार सुरू असल्याच नीशा म्हणालीय. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नीशा म्हणाली, ” करण मेहराच्या प्रतिष्ठेसाठी मी अनेक वर्ष या अत्याचारांबद्दल बोलले नाही. एखाद्या अभिनेत्यासाठी त्याची कारकीर्द आणि प्रतिमा अत्यंत महत्त्वपूर्ण असते आणि म्हणूनच मी गप्प बसले.” असा दावा नीशाने केलाय. मीडिला दिलेल्या एका मुलाखतीचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. यात नीशाने करणच्या अफेअरबद्दल खुलासा केलाय.

आणखी वाचा: ‘ये रिश्ता क्या कहलता है’ फेम अभिनेता करण मेहराला अटक, पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

करणवर केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा नीशा रावलने केला आहे. पती करण मेहराच्या फोनवर काही मसेज सापडल्यानंतर त्याच्या अफेअर बद्दल लक्षात आल्याचं ती म्हणाली आहे. मात्र कुटुंब आणि मित्र परिवारापासून तिने सर्व गोष्टी लपवल्या. लग्न टिकणार नाही हे लक्षात आल्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं निशा म्हणाली. घटस्फोटानंतरच्या पोटगी बाबबत त्यांच्यात चर्चा सुरू होती.

आणखी वाचा: ”माझं शरीर..माझी अब्रू..माझी मर्जी”, ओढणी का घेत नाहीस विचारणाऱ्या युजरला दिव्यांका त्रिपाठीची चपराक

दरम्यान करणनेही नीशावर काही आरोप केले आहेत. निशाने करणच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली असून त्यांना धमकावल्यचा आरोप करणने केलाय. निशाने पोटगीसाठी मोठी रक्कम मागितल्याचा दावा त्याने केलाय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 9:55 pm

Web Title: karan mehara wife nisha rawal accuses karan having extra marital affair kpw 89
Next Stories
1 नर्गिस दत्त यांच्या वाढदिवशी संजय दत्तने शेअर केली इमोशनल पोस्ट; मुलगी त्रिशालाने दिली ही प्रतिक्रिया
2 ‘या’ अभिनेत्रीशी लग्न करण्यासाठी गोविंदाने मोडला होता साखरपुडा
3 ऐश्वर्या आणि सूर्यभान यांच्या लग्नाला बायजींचा पुढाकार
Just Now!
X