टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध जोडी निशा रावल आणि करण मेहरा यांच्या वादाची चर्चा अजूनही सुरू आहे. या वादात अभिनेत्री निशा रावल आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करणं मात्र विसरलेली नाही. १४ जून रोजी अभिनेता करण मेहरा आणि अभिनेत्री निशा रावल यांचा मुलगा काविशचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. या सेलिब्रेशनमध्ये सर्व पाहूणे दिसून आले. मात्र, वडील करण मेहरा मात्र गायब दिसला. त्याची इच्छा असूनही तो आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये जाऊ शकला नाही. या सेलिब्रेशनचे फोटोज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

निशाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर मुलगा काविशच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे कोणतेच फोटोज किंवा व्हिडीओज शेअर केले नाहीत. पण निशाचा जवळचा मित्र सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित वर्माने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटोज आणि व्हिडीओज शेअर केले आहेत. त्यानंतर हे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. या व्हिडीओजमध्ये काविश थ्री टायर केक कापताना दिसून आला. तसंच निशा रावल ही आपल्याला मुलाला केक भरवताना दिसून आली. निशा आणि मुलगा काविश दोघांनी ही ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट कॉम्बिनेशनचे ड्रेस परिधान केलेले दिसून आले. या पार्टीमध्ये निशा तिच्या सगळ्या जवळच्या मित्र-मैत्रिणींसोबत एन्जॉय करताना दिसून आली.

Nisha-Rawal-celebrating-son-kavish-birthday-1
(Photo: Instagram@rohitkverma)
Nisha-Rawal-celebrating-son-kavish-birthday-2
(Photo:Instagram@rohitkverma)

या सेलिब्रेशनमध्ये अभिनेता करण मेहरा मात्र कुठेच दिसून आला नाही. मुलाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये त्याला सहभागी होता आलं नाही म्हणून त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मुलाला शुभेच्छा पाठवल्या. करणने आपल्या मुलासोबतचा एक फोटो त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. हा फोटो शेअर करताना त्याने एक इमोशनल कॅप्शन देखील लिहिलीय. यात त्याने लिहिलं, “माझ्या छोट्याश्या मुलाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…देव तुझं कायम रक्षण करत राहो…मला आठवतंय, मी तुमच्यावर गजेलियन टाइम प्रेम करतो असं तु मला कायम बोलत असतोस. मी कायम तुझ्या ह्रदयाजवळच असणार आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Mehra (@realkaranmehra)

निशा आणि करण यांच्यात सुरू असलेल्या वादाने सध्या भयंकर रूप धारण केलंय. एकीकडे निशाने करणवर घरगुती हिंसा आणि विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केलाय. तर दुसरीकडे करणने निशाला बायपोलर असल्याचं म्हणत दोघेही वेगळे झाल्याचं सांगितलं. दोघांची वैयक्तिक भांडणे आता कायद्याच्या चौकटीत सोडवली जाणार आहेत.