01 March 2021

News Flash

Drugs Case : दिया मिर्झाच्या एक्स मॅनेजरसह करण सजनानीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

या दोघांकडे सापडला २०० किलो गांजा

अभिनेत्री दिया मिर्झाचा एक्स मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि व्यावसायिक करण सजनानी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांकडे २०० किलो गांजा सापडला होता. याप्रकरणी आता त्यांना ३० जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईच्या एस्प्लेनेट कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

काही दिवसांपूर्वी एनसीबीच्या मुंबई युनिटने मुंबईतील तीन भागांमध्ये छापे टाकले होते. यात दोन महिला आणि एका ब्रिटीश नागरिकाला अटक करण्यात आली होती. तसंच अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बॉलिवूडची माजी मॅनेजर राहिला फर्निचरवाला, शाहिस्ता फर्निचरवाला आणि करण सजनानी या तिघांचादेखील समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.


याप्रकरणी झालेल्या चौकशीमध्ये सजनानीने तो कोणाला ड्रग्स पुरवतो हे सांगितलं आहे. तसंच त्याने मुच्छ पानवाले यांचंही नाव घेतलं आहे. दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर कलाविश्वातील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी आतापर्यंत सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, श्रद्धा कपूर, अर्जुन रामपाल, दीपिका पदुकोण या सारख्या अनेक दिग्गज कलाकारांची नाव समोर आली असून त्यांची एनसीबीने चौकशी केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2021 12:24 pm

Web Title: karan sajnani along with dia mirzas former manager jailed for 14 days ssj 93
Next Stories
1 सोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड?
2 प्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ? पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा
3 आठवणी… ७० एमएम!
Just Now!
X