04 March 2021

News Flash

टेलिव्हिनच्या हॅण्डसम बॉयचा बर्थडे; मालदीवमध्ये करणचं सेलिब्रेशन

लाखो तरुणींचा क्रश

मॉडेल आणि अभिनेता करण सिंग ग्रोवरने छोट्या पद्यावरुन आजवर लाखो तरुणींची मनं जिंकली आहेत. करणने अनेक मालिकांमधून वेगवेगळी पात्र साकारली आहेत. अभिनयासोबत डॅशिंग लूक आणि फिटनेसमुळे करणने लाखो तरुणींच्या मनावर राज्य केलं. छोट्या पडद्यावरचा हण्डसम हिरो अशी करणची ओळख आहे. ‘दिल मिल गये’ ही करणची सर्वात लोकप्रिय मालिका ठरली असून या मालिकेतील त्याच्या ‘डॉक्टर अरमान’ या भूमिकेने चाहत्यांना वेड लावलं होतं.  या मालिकेमुळे अनेक तरुणी करणवर फिदा होत्या. आजही करणचा मोठा चाहतावर्ग आहे. तर रिलेशनशिप्स आणि तीन लग्न यामुळे करण कायम चर्चेत राहिला.

करण सिंग ग्रोवरचा आज 39 वा वाढदिवस आहे. पत्नी बिपाशा बासूसोबत करण सध्या मालदीवमध्ये त्याच्या बर्थडेचं सेलिब्रिशन करतोय. करण सिंग ग्रोवरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालदीवचे फोटो शेअर केले आहेत. तर बिपाशाने देखील करणचा फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘वर्षातील माझा दुसरा सर्वात आवडता दिवस …हॅपी बर्थ डे करण.. i love u ‘ असं कॅप्शन देत बिपाशाने करणला शुभेच्छा दिल्या आहेत. बिपाशाच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी करणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बिपाशा आणि करण मालदीवमध्ये वेळ घालवत आहेत. मालदीवमधील रोमॅण्टिक फोटो दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu)

छोट्या पडद्यावरचा हॅण्डसम बॉय

छोट्या पडद्यावर सुपरहिट ठरलेल्या अभिनेत्यांपैकी करण सिंग ग्रोवर आघाडीवर आहे. करणने मालिकांसोबतच काही सिनेमांमध्ये देखील अभिनयाची छाप पाडली. 2004 सालात ‘कितनी मस्त है जिंदगी’ या मालिकेतून करणने अभिनयात पदार्पण केलं. यानंतर करणने काही मालिका केल्या. ‘कसौटी जिंदगी की’ या एकता कपूरच्या लोकप्रिल मालिकेत करणने महत्वाची भूमिका साकारली. मात्र 2007 सालात आलेल्या ‘दिल मिल गये’ या मालिकेमुळे करणला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत डॉक्टर अरमानची भूमिका साकारणाऱ्या करणला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. या मालिकेतील करणच्या भूमिकेमुळे लाखो तरुणी त्याच्या प्रेमात पडल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by karan singh grover (@iamksgofficial)

‘दिल मिल गये’ मालिकेनंतर करण काही रिअ‍ॅलिटी शोमध्ये झळकला. या मालिकेनंतर करण सिंग ‘तेरी मेरी लव्ह स्टोरी’ आणि ‘दिल दोस्ती डान्स’ या मालिकांमधून झळकला. खास करुन तरुण वर्गानं करणच्या भूमिकांना कायम पसंती दिली.
करणच्या अनेक मालिका गाजल्यानंतर करणचं करिअर काहिसं मदावल्याचं पाहायला मिळालं. ‘अलोन’ आणि ‘हेट स्टोरी-3’ या सिनेमांधून करणने बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलं. मात्र हे सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसे हिट ठरले नाहीत. त्यानंतर करणने पुन्हा छोट्या पडद्याकडे मोर्चा वळवला. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेच्या दुसऱ्या भागात करणने ऋषिभ बजाजची भूमिका साकारली. तर काही वेब सिरीजमध्ये करण झळकला.

 

View this post on Instagram

 

A post shared by karan singh grover (@iamksgofficial)

करण सिंग ग्रोवर त्याच्या रिलिशनशिप्समुळे देखील कायम चर्चेत राहिला. बिपाशा बासूसोबत करणचं हे तीसरं लग्न आहे. दोघेही सोशल मीडियावर एकत्र वेळ घालवतानाचे फोटो शेअर करत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by karan singh grover (@iamksgofficial)

गेल्या काही दिवसांपासून करण अभिनय क्षेत्रापासून दुरावल्याचं दिसतंय.असं असलं तरी करण सिंगच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडून तुफान लाईकस् मिळत असल्याचं पाहायला मिळतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 10:55 am

Web Title: karan sing grover celebrating his birthday with wife bipasha basu in maldivs kpw 89
Next Stories
1 ‘काइ पो चे’ची आठ वर्ष! सुशांतच्या आठवणीत दिग्दर्शक भावूक; म्हणाले…
2 शाहिद नव्हे तर ‘हा’ आहे मीरा राजपूतचा crush म्हणाली… l love him
3  ‘घेतला वसा टाकू नका’; चातुर्मासामधील कथा आता पडद्यावर
Just Now!
X