26 October 2020

News Flash

‘कसौटी जिंदगी की 2’ सोडण्यावर करण सिंह ग्रोवर म्हणाला…

त्याने एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

छोट्या पडद्यावरील काही मालिका अशा आहेत ज्या प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. त्या मालिकांचे दुसरे पर्वही चाहते आवडीने पाहतात. या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘कसौटी जिंदगी की २. ’ काही दिवसांपूर्वी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. तसेच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीलाही उतरत असल्याचे पाहायला मिळाले. या मालिकेत अभिनेता करण सिंह ग्रोवरने मिस्टर बाजाची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली. पण करणने अचानक मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने हा निर्णय का घेतला असा प्रश्न अनेकांना पडला होता. आत करणने यावर वक्तव्य केले आहे.

करणने नुकतीच ‘पिंकव्हीला’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने कसौटी जिंदगी की मालिका सोडण्यामागचे कारण सांगितले आहे. ‘हा माझा किंवा मालिकेच्या निर्मात्यांचा निर्णय नव्हता. आज करोना व्हायरसमुळे ही परिस्थिती उद्भवली नसती तर मी आजही ती भूमिका साकारत असतो’ असे करणने म्हटले आहे.

‘कसौटी जिंदगी की’ ही मालिका करण सिंह ग्रोवरने सोडल्यानंतर अभिनेता करण पटेलला या भूमिकेची ऑफर देण्यात आली. करणने ती स्वीकारली असून तो मिस्टर बजाजच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच मालिकेत पार्थ समथान अनुराग बासूची भूमिका साकारत आहे.

करण सिंह ग्रोवर लवकरच ‘डेंजरस’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत त्याची पत्नी बिपाशा बासू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म MX Player वर प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 12:48 pm

Web Title: karan singh grover on kasautii zindagii avb 95
Next Stories
1 सलमान खानने गायलं देशभक्तीपर गीत; व्हिडीओ होतोय व्हायरल
2 “सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है”; वाचा स्वातंत्र्यदिनावर गाजलेले शेर
3 इतिहास तेव्हाच घडतो जेव्हा महिला… ; प्रियांकाने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
Just Now!
X