News Flash

करोनाच्या भीतीने अभिनेत्याने सोडली मुंबई, सध्या राहतोय फार्महाउसवर

मुंबईमधली अंधेरी इथल्या त्याच्या राहत्या इमारतीत पाच करोना रुग्ण आढळल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे.

करण ठक्कर

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे टीव्ही अभिनेता करण ठक्कर कुटुंबीयांसह मुंबईहून लोणावळ्याला राहायला गेला. मुंबईमधली अंधेरी इथल्या त्याच्या राहत्या इमारतीत पाच करोना रुग्ण आढळल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे. वृद्ध आईवडिलांच्या आरोग्याची काळजी करत त्याने हा निर्णय घेतला आहे.

‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत करण म्हणाला, “मी राहत असलेल्या इमारतीत अनेक करोनारुग्ण आढळले. त्यामुळे मी शहराबाहेर जाण्याचा विचार केला. माझ्या आईवडिलांच्या तब्येतीची मला जास्त काळजी आहे. सुदैवाने आम्ही सर्वजण सुखरुप आहोत.” यादरम्यान शूटिंगला जावं लागल्यास पुन्हा मुंबईला येईन असं त्याने सांगितलं. मात्र लोणावळ्याला गेल्यानंतर क्वारंटाइनमध्ये राहणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Tacker -Agent Farooq Ali (@karantacker) on

आणखी वाचा : “टीव्हीने माझ्यावर बंदी आणली म्हणून बॉलिवूडकडे वळलो”; अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

करणने २००९ मध्ये ‘लव्ह ने मिला दी जोडी’ या मालिकेतून करिअरची सुरुवात केली. कलाविश्वात त्याने नुकतीच ११ वर्षे पूर्ण केली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 5:53 pm

Web Title: karan tacker shifts from mumbai to lonavala house after five people test covid 19 positive in his building ssv 92
Next Stories
1 शाहरुखला पाहून रडू लागला चाहता, व्हिडीओ व्हायरल
2 इतर भाषा आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करायला आवडेल- मुक्ता बर्वे
3 सलमानपाठोपाठ आता ‘हा’ सुपस्टारही राबतोय शेतात; व्हिडिओ झाला व्हायरल
Just Now!
X