News Flash

‘कारभारी लयभारी’ फेम प्रणित हाटे ‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये सहभागी होणार?

एका मुलाखतीत प्रणित म्हणाली....

bigg-boss-marathi
(Photo-Loksatta file images)

कलर्सवरील लोकप्रिय तितकीच वादग्रस्त शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या दोन सिझनच्या यशा नंतर आता लवकरच या शोचा तिसरा सिझन येत आहे. काही दिवसांपूर्वी मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिझन चा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. या प्रोमो नंतर आता या शोसाठी अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत. या यादीत ‘कारभारी लयभारी’ मध्ये  गंगाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रणित हाटे हीच नावसुद्धा चांगलचं चर्चेत असून आता प्रणितने या बाबत मोठा खुलासा केला आहे.

अभिनेत्री प्रणित हाटे ‘बिग बॉस मराठी’ च्या ३ सिझनमध्ये  सहभागी होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. अशात या चर्चा बोगस असल्याचा खुलासा केला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत प्रणितने ती या शोमध्ये सहभागी होत नसल्याचे सांगितले आहे. “सोशल मीडियावर ज्या चर्चा रंगत आहेत त्या केवळ अफवा आहेत, मी ‘बिग बॉस मराठी’ मध्ये सहभागी होणार नाही. या शोचा भाग होऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करायला मला आवडेल मात्र या शोच्या निर्मात्यांकडून मला कोणत्याही प्रकारची ऑफर आली नाही. मला नाही ठाऊक की प्रेक्षकांना असे का वाटते आहे पण निदान यावेळेस तरी मी या शोचा भाग नसेन एव्हढे नक्की.”

प्रणितला ‘बिग बॉस मराठी ३’ च्या घरात बघण्यासाठी प्रेक्षक खुप उत्सुक होते. मात्र प्रणितने या शोमध्ये सहभागी होतं नसल्याचे जाहीर करताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गंगा म्हणजेच प्रणित बरोबर इतर अनेक कालाकारांची नावे चर्चेत आहेत. या यादीत ‘हे मन बावरे’ मालिकेतील अभिनेता संग्राम समेळ आणि ‘फतेशिकस्त’ चित्रपटातील अभिनेत्री नेहा जोशी हे देखील सामील आहेत. ‘बिग बॉस मराठी ३’ १९ सप्टेंबरपासून कलर्स वाहिनीवर प्रसारित होणार आहे. आता या नवीन धमाकेदार सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2021 4:45 pm

Web Title: karbhari lay khari fame actress parnit hate to participate in bigg boss marathi season 3 aad 97
Next Stories
1 स्टार प्रवाहच्या कलाकारांचा जल्लोष, पारंपरिक पद्धतीने होणार गणरायाचं स्वागत
2 Video: शमिताने राकेशच्या खिश्यात दिव्याचे लिप बाम पाहिले अन्…
3 “या मुलासोबत तुझी स्पर्धा आहे”, राकेश बापटला पाहून जया बच्चन अभिषेकला म्हणाल्या होत्या…