News Flash

मुंबईतील धक्कादायक घटना! ‘कारभारी लयभारी’मधील अभिनेत्रीला भररस्त्यात मारहाण

स्वत: अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत घडलेली घटना सांगितली आहे

झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘कारभारी लयभारी’मधील अभिनेत्रीला मुंबईतील रस्त्यावर काही लोकांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. स्वत: अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत घडलेली घटना सांगितली आहे.

‘कारभारी लयभारी’ मालिकेत गंगा रोजच्या प्रमाणे चित्रीकरण संपवून घरी जायला निघाली होती. नेहमी प्रमाणे ती बसस्टॉपवर बसची वाट पाहात बसली होती. दरम्यान काही लोकं तेथे आले आणि त्यांनी तिला विनाकारण मारहाण करायला सुरुवात केली. गंगा कशीबशी रिक्षा पकडून तेथून घरी पोहोचली. रिक्षामध्ये बसल्यानंतर तिने रडतरडत हा व्हिडीओ शूट केला आहे. गंगाला मारणार कोणी केली? का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

‘मी नेहमी प्रमाणे बस स्टॉपवर बसची वाट पाहात होते. अचानक तेथे काही मुले आली आणि मला विनाकारण मारहाण करु लागली. मी काय करु? कुठे जाऊ? कोणाची मदत घेऊ? प्लीज मला सांगा’ असे गंगा रडत व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे.

‘युवा डान्सिंग क्वीन’ या शोमधून गंगाचा चेहरा सर्वांसमोर आला. गंगा ही एक ट्रान्सजेंडर असून तिचे खरे नाव प्रविण हाटे आहे. ती सध्या कारभारी लयभारी या मालिकेत गंगा ही भूमिका साकारत आहे. गंगाचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय कठिण होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2021 3:26 pm

Web Title: karbhari layabhari actress ganga was attacked some people at bus stop mumbai avb 95
Next Stories
1 ‘अग्गंबाई सूनबाई’मध्ये बबड्यासुद्धा बदलणार, ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका
2 शाहिद कपूर झळकणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत?, बिग बजेट सिनेमाची चर्चा
3 ‘तारक मेहता…’मध्ये दयाबेनच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री?
Just Now!
X