News Flash

पुन्हा त्याच जोशात येत आहे कारभारी लयभारी!

आता ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे

राजकारणावर बेतलेल्या कारभारी लयभारी मालिकेने सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या मनात घर करायला सुरुवात केली होती. “डोळ्यात जाळ हाय, दुश्मनाचा काळ हाय काळीज कापतंय नजरेची सूरी, आला आला कारभारी लयभारी…!” हे गाणं विशेष गाजलं. या मालिकेच्या निमित्ताने अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर आली. या मालिकेची कथा तेजपाल वाघ यांची असून ‘देवमाणूस’ या मालिकेचे संवाद लेखक विशाल कदम यांनी या मालिकेचे देखील संवाद लिहिले आहेत तर पटकथा स्वप्नील गांगुर्डे याची आहे.

देशभरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव, महाराष्ट्रात लॉकडाउनचा निर्णय, लॉकडाउनच्या काळात अनेक गोष्टींवर आलेले निर्बंध, यामध्ये मालिका, सिनेमांच्या चित्रिकरणावर पूर्णपणे बंदी, यामुळे ‘कारभारी लयभारी’ मालिकेने थोडा ब्रेक घेतला होता. पण आता ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. मालिकेत बऱ्याच घडामोडी घडताना दिसणार आहेत.

काकी वीरु आणि त्याच्या आईला ज्या पद्धतीने वागवते ते पाहून पियू ठरवते की या घरात त्या दोघांना त्यांचा मान मिऴवून द्यायचा, राजवीरचे वडील जसे त्या गावचे कारभारी होते आणि त्यांचा पक्षात, राजकारणात आणि विरोधकांसमोर एक दरारा होता त्याच प्रमाणे राजवीरने सुद्धा गावच्या भल्यासाठी सक्रिय राजकारणात काम करावं यासाठी प्रियांका विशेष प्रयत्न करताना दिसणार आहे. पण सक्रिय राजकारणातला राजवीरचा हा प्रवेश त्याच्या जीवावर तर बेतणार नाही ना? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. चाहत्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे आगामी भागामध्ये मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 5:39 pm

Web Title: karbhari laybhari serial update avb 95
Next Stories
1 “खऱ्या इस्लाममध्ये स्त्रियाचं अस्तित्व पुरूषांच्या पायाजवळच”, म्हणणाऱ्या नेटकऱ्याला गौहरने दिले सडेतोड उत्तर
2 अभिनेते केडी चंद्रन यांचे निधन
3 Radhe Box Office Collection: सलमानच्या ‘राधे’ची डिजिटल प्लॅटफॉर्मवर बक्कळ कमाई
Just Now!
X