बऱ्याचदा आपला आवडता सेलिब्रिटी दिसल्यानंतर चाहते त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी पुढे सरसावतात. मात्र कधी-कधी या चाहत्यांना सेलिब्रिटींच्या रागाला सामोरं जावं लागतं. असंच करीना कपूर-खानच्या चाहतीसोबत झालं आहे. करीनासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चाहतीला करीनाने चांगलंच झापलं. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेकांनी करीनावर टीकाही केली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये करीना, तैमूरसोबत होळी साजरी करण्यासाठी जात होती. यावेळी तिला पाहिल्यानंतर अनेक चाहते पुढे आले. मात्र एक चाहती सतत करीनाकडे फोटोसाठी तगादा लावत होती. त्यामुळे वैतागलेल्या करीनाने राग व्यक्त केला.
View this post on Instagram
#taimuralikhan after playing holi today #saifalikhan #kareenakapoorkhan #viralbahayani @viralbhayani
या व्हिडीओमध्ये मुळात करीनाचा मूड थोडा खराब असल्याचं पाहायला मिळत होतं. त्यातच ही चाहती सतत तिला फोटो काढण्यासाठी विनवत होती. हे पाहून करीना चिडली आणि तिने चाहतीला खडेबोल सुनावले. मात्र त्यानंतर तेथे उभ्या असलेल्या मुलींसोबत फोटोही काढला. परंतु करीना ज्या पद्धतीने वागली ते पाहून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.
‘चाहत्यांसोबत असं वागणाऱ्या सेलिब्रिटींना महत्त्व द्यायला नकोय. जे फोटो काढणं तर दूर पण साधं तुमच्याकडे बघून नीट हसतसुद्धा नाही’, असं एका नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तर ‘याच अॅटीट्युडमुळे हे लोक प्रसिद्ध होतात.मात्र एवढा गर्व योग्य नाही’, असं आणखी एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.
वाचा : हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याला करोनाचा संसर्ग; ट्विट करून दिली माहिती
दरम्यान, करीना लवकरच अंग्रेजी मीडियम या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता इरफान खान आणि राधिका मदन हे कलाकार झळकणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 12, 2020 9:38 am