News Flash

करीना कपूरने शेअर केला दुसऱ्या बाळाचा फोटो; चिमुकल्यासोबत खेळण्यात सैफ आणि तैमूर दंग

फोटो शेअर करत करीनाने चाहत्यांना विचारलं...

करीना दुसऱ्यांदा आई झाल्यापासून तिच्या दुसऱ्या बाळाला पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक होते. तर दुसऱ्या बाळाला मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय सैफिनाने घेतला होता. सैफिनाने दुसऱ्या बाळाचं नाव काय ठेवलंय हे जाणून घेण्याचीदेखील अनेकांना उत्सुकता आहे.

अखेर करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या दुसऱ्या बाळाचा एक गोड फोटो शेअर केला आहे. यात सैफ अली खान आणि तैमूर त्यांच्या कुटुंबातील नव्या पाहुण्यासोबत खेळताना दिसत आहेत. या फोटोत करीनाचं दुसऱं बाळ दिसतंय. मात्र सैफिनाने चाहत्यांची उत्सुकता ताणून धरली आहे. कारण या फोटोत करीनाचं दुसरं बाळ दिसत असलं तरी करीनाने एका बाळाचं इमोजी पेस्ट करत दुसऱ्या मुलाचा चेहरा मात्र या फोटोत दिसू दिला नाही.

करीनाने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे, ” माझा विकेण्ड काहीसा असा असतो, तुमचा कसा असतो मित्रांनो?” असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. करीनाच्या या फोटोला चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसतेय. काही काळातच हा फोटो व्हायरल होऊ लागला आहे.

या आधी आजोबा रणधीर कपूर यांनी चुकून त्यांच्या नातवाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत तैमूरच्या धाकट्या भावाचे दोन फोटो कोलाज करून रणधीर यांनी शेअर केले होते. मात्र, त्यांना तो फोटो सोशल मीडियावर शेअर करायचा नव्हता. कारण, शेअर केल्याच्या काही क्षणातच त्यांनी तो फोटो डीलीट केला. त्यांनी तो फोटो डीलीट केला असलां तरी सुद्धा तो फोटो काही नेटकऱ्यांनी पाहिला होता.

‘बिग बुल’ पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया; अभिषेकला म्हणाले…

तर करीना कपूरनेदेखील ‘जागतिक महिला दिन’च्या निमित्ताने दुसऱ्या बाळाचा एक फोटो शेअर केला होता. यात बाळाची फक्त एक झलक पाहायला मिळाली होती. त्यामुळे अजूनही प्रेक्षकांमध्ये सैफिनाच्या दुसऱ्या बाळाला पाहण्याची उत्सुकता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 12:15 pm

Web Title: kareena kapoor drops new born son photo playing with saif ali khan and taimur kpw 8
Next Stories
1 ‘बिग बुल’ पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया; अभिषेकला म्हणाले…
2 ‘नशा उतरा नही अब तक’, मास्क न लावल्यामुळे भारती सिंह झाली ट्रोल
3 “मी दिवसाला १६ कोटी कमवत असतो तर नक्कीच..”; अर्जुन कपूरचं ट्रोलरला सडेतोड उत्तर
Just Now!
X