News Flash

Coronavirus : कोणी हात मिळवण्याचा प्रयत्न केल्यास करीना करते ‘हे’ काम

करीनाचा हा फोटो पाहाच!

करीना कपूर

अभिनेत्री करीना कपूरने इन्स्टाग्राम अकाऊंट उघडत चाहत्यांना सुखद धक्का दिला. काही दिवसांतच तिचे २० लाख फॉलोअर्स झाले आहेत. दररोज काही ना काही फोटो टाकून करीना तिच्या खासगी आयुष्याविषयी बऱ्याच गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतेय. सध्या जगभरात करोना विषाणूचीच चर्चा आहे. शूटिंग बंद असल्याने सध्या सेलिब्रिटी घरीच आहेत आणि सोशल मीडियाद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच करीनाने तिच्या हटके स्टाइलमध्ये सोशल डिस्टस्निंग म्हणजे काय हे सांगितलंय.

करीनाने तिच्या बालपणीचा फोटो पोस्ट करत लिहिलं, ‘मी.. जेव्हा हल्लीच्या दिवसांत कोणी हात मिळवण्याचा प्रयत्न करतो.’ सुरक्षित राहा आणि घरी राहा असा संदेश करीनाने या पोस्टमधून दिला.

कोरोना व्हायरस हा कोव्हिड-19 झालेल्या आजारी रुग्णाला शिंका आली किंवा ते खोकले तर त्यांच्या नाका-तोंडातून बाहेर पडून हवेत येतो. आता जर तुम्ही त्यांच्या आसपास असाल तर हा व्हायरस तुमच्यावर हल्ला करण्याची शक्यता आहेच. हा व्हायरस तुमच्या नाका-तोंडातून, डोळ्यातून तुमच्या शरीरात शिरतो. त्यामुळेच आपल्याला मास्क लावण्याच्या, आणि आपण सतत हात चेहऱ्याला लावत असतो म्हणून हात स्वच्छ ठेवण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. पण हे सतत करणं शक्य नसल्यामुळे सध्या गरज आहे ती एकमेकांपासून दूर राहण्याची. यालाच social distancing (सोशल डिस्टन्सिंग) म्हटलं जातं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 10:20 am

Web Title: kareena kapoor explains social distancing with funny childhood pic ssv 92
Next Stories
1 अश्लील गाण्यात घेतलं महात्मा गांधीजींचं नाव; गायिकेविरोधात FIR दाखल
2 प्रेमासाठी वाट्टेल ते! हेमामालिनीसाठी धर्मेंद्रंनी केलं होतं अख्खं रुग्णालय बूक
3 ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याविरोधात गुन्हा दाखल
Just Now!
X