17 November 2017

News Flash

सारा अली खानच्या बॉलिवूड पदार्पणावर सल्ला देण्यास करिनाचा नकार

'प्रत्येकाला सल्ले देत बसण्यासाठी मी कोणी शिक्षिका नाही.'

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: July 17, 2017 2:47 PM

सारा अली खान, करिना कपूर

एकीकडे बॉलिवूडमधील सर्व कलाकार आयफा २०१७ पुरस्कार सोहळ्यात व्यस्त असताना अभिनेत्री करिना कपूर खानने एका पुस्तक प्रदर्शन सोहळ्याला हजेरी लावणे पसंत केले. ऋतुजा दिवेकर यांच्या ‘प्रेगनेंसी नोट्स : बिफोर, ड्युरिंग अॅण्ड आफ्टर’ या पुस्तक प्रदर्शन कार्यक्रमात करिनाने सारा अली खानच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल अखेर मौन सोडले. ‘मी कोणी शिक्षिका नाही की प्रत्येकाला सल्ले देत बसू,’ असे उत्तर करिनाने यावेळी दिले.

सारा ही सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंगची मुलगी आहे. सारा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून याबाबत तिला काही सल्ले देणार का, असा प्रश्न करिनाला या कार्यक्रमात विचारला गेला. यावेळी करिना म्हणाली की, ‘सारा अजून तरुण असून, चित्रपटात तिचे करिअर उज्ज्वल आहे.’

सुरुवातीला अभिनय क्षेत्रात पदार्पणासाठी साराला सैफचा विरोध होता. तर आई अमृता सिंगचा तिला पूर्ण पाठिंबा होता. अशा वेळी बॉलिवूडमध्ये यशस्वी ठरलेली करिना साराला काही सल्ले देणार का? असे अनेक प्रश्न विचारले जात होते. याविषयी करिना पुढे म्हणाली की, ‘सारा अतिशय हुशार आहे. अभिनय तर तिच्या रक्तामध्ये आहे. ती दिसायलाही अतिशय सुंदर आहे. हुशारी आणि सौंदर्याच्या जोरावर ती बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालेल, यावर माझा विश्वास आहे.’

वाचा : आलोकनाथ नीना गुप्ताला डेट करत होते तेव्हा..

सारा अली खान लवकरच दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्या ‘केदारनाथ’ या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. या चित्रपटात सारासोबत अभिनेता सुशांत सिंग राजपूत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून ती पदार्पण करणार असल्याची याआधी चर्चा होती. ‘केदारनाथ’ या चित्रपटात दोन तीर्थयात्रेकरूंची प्रेमकथा दर्शवण्यात येणार असून, चित्रीकरणाला सुरुवात करण्याआधी अभिषेक कपूर आणि सारा अली खान यांनी केदारनाथचे दर्शन घेतले होते. दर्शनानंतरचे त्यांचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते.

First Published on July 17, 2017 2:47 pm

Web Title: kareena kapoor finally talks about sara ali khan debut in bollywood