News Flash

अनुष्कानंतर करीनाने केला बेबीबंपसोबत योग; फोटो होतोय व्हायरल

पाहा, करीनाने शेअर केलेले फोटो

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान लवकरच आई होणार आहे. त्यामुळे सध्या करीना तिचा प्रेग्नंसी काळ एन्जॉय करत आहे. त्यासोबतच ती तिच्या फिटनेसकडेही तितकंच लक्ष देताना दिसत आहे. अलिकडेच करीनाने इन्स्टाग्रामवर तिचे योग करतानाचे काही फोटो शेअर केले आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर करीनाच्या या फोटोंची चर्चा रंगली आहे.

करीनाने इन्स्टाग्रामवर तिचे योग करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने एका फोटोमध्ये काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये ती गुलाबी रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. करंट मूड…अधिक स्ट्रेच असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. या फोटोच्या माध्यमातून तिने एका प्रसिद्ध ब्रॅण्डची जाहिरातदेखील केल्याचं दिसून येत आहे.


करीना दुसऱ्यांदा आई होणार आहे. त्यामुळे गरोदरपणातील अनुभव ती ‘प्रेग्नंसी बायबल’ या पुस्तकात लिहित आहे. करीनाचे हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. तैमूरच्या वाढदिवशी करीनाने या पुस्तकाची घोषणा केली होती. या पुस्तकात करीनाने डाएट ते मॉर्निंग सिकनेस आणि फिटनेसबद्दलही लिहिलं आहे.

वाचा : ईदच्या दिवशी धडकणार ‘सत्यमेव जयते 2’चं वादळ; पोस्ट शेअर करत जॉन म्हणतो…

दरम्यान, कलाविश्वातील अनेक अभिनेत्रींनी त्यांचा प्रेग्नंसी काळ एन्जॉय केला आहे. यात अनुष्का शर्मा, अनिता हंसनंदानी, समीरा रेड्डी अशा अनेक अभिनेत्री त्यांच्या गरोदरपणात कूल असल्याचं पाहायला मिळालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 4:40 pm

Web Title: kareena kapoor flaunts baby bump as she does yoga ssj 93
Next Stories
1 सिद्धार्थ-सखीची ‘बेफाम’ केमिस्ट्री; पहिल्यांदाच शेअर करणार स्क्रीन
2 सैफ करीनाला डेट करतोय हे कळताच रानी मुखर्जीने दिला ‘हा’ सल्ला
3 सिद्धार्थशी लग्न झाल्यानंतर मितालीचा महत्त्वाचा निर्णय; सोशल मीडियावरून दिली ‘ही’ माहिती
Just Now!
X