News Flash

आईसाठी तैमूरने तयार केला खास नेकलेस, करीनाने पोस्ट केला फोटो

करीना, सैफ-तैमुर होम क्वारंटाइनमध्ये

करिना कपूर आणि तैमुर अली खान

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अभिनेत्री करीना कपूर आपली पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूरसोबत घरात क्वारंटाइन झालेली आहे. नेहमी आपल्या शुटिंगमुळे व्यस्त असलेल्या करीनाला आपल्या मुलासोबत वेळ घालवायला मिळतो आहे. क्वारंटाइनच्या काळात करिना सैफ आणि तैमुर घरात काय काय करत असतात याचे पोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत असते.

तैमुरने करीनासाठी चक्क पास्ताच्या नेकलेस तयार केला आहे. हा नेकलेस घालून करीनाने आपला फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

याआधी करीनाने तैमुरच्या चित्रकलेचे काही सुंदर नमुने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकले होते. इरफान खानच्या अंग्रेजी मीडियम या सिनेमात करीना कपूरने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका केली होती. केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची घोषणा व्हायच्या आधी करीना लालसिंह चड्ढा या सिनेमासाठी शूट करत होती. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे सर्व सिनेमा आणि टीव्ही मालिकांची चित्रीकरणं ठप्प झालेली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 4:13 pm

Web Title: kareena kapoor flaunts pasta necklace made by son taimur ali khan see pic psd 91
Next Stories
1 ‘एक थी बेगम’मधून उलगडणार अश्रफ भाटकरचा प्रवास?
2 ‘खिचडी’ आणि ‘साराभाई’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कधी आणि कुठे
3 ..जेव्हा सलमानने जाळला होता वडिलांचा पगार
Just Now!
X