25 October 2020

News Flash

केवळ ‘या’ अटीवर करिनाने बांधली सैफशी लग्नगाठ

या दोघांमध्ये तब्बल १० वर्षांचं अंतर असून ही जोडी कलाविश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.

करीना कपूर, सैफ अली खान

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानने त्याच्या अनोख्या अभिनय शैलीमुळे कलाविश्वामध्ये स्वत:च असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. गंभीर, विनोदी अशा एक ना अनेक भूमिका त्याने साकारल्या असून त्याच्या याच भूमिकांमुळे त्याने प्रेक्षकांमध्ये एक वेगळी छाप पाडली आहे. सैफने २०१२ मध्ये अभिनेत्री करिना कपूरसोबत लग्नगाठ बांधली. या दोघांमध्ये तब्बल १० वर्षांचं अंतर असून ही जोडी कलाविश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. अनेक वेळा या दोघांच्या वयातील अंतरामुळे सोशल मीडियावर त्यांची चर्चा रंगते. या दोघांची लव्हस्टोरी जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहतेही उत्सुक असतात. विशेष म्हणजे सैफशी लग्न करण्यापूर्वी करिनाने सैफसमोर एक अट ठेवली होती.

‘टशन’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सैफ आणि करिना एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर ‘कुर्बान’ चित्रपटातही दोघांमधील रोमॅण्टिक केमिस्ट्री पाहायला मिळाली. सैफसोबत लग्न करण्यापूर्वी करिनाने त्याच्या पुढे एक अट ठेवली होती. कायम स्वावलंबी राहण्याला महत्व देणाऱ्या करिनाला लग्नानंतरही तसंच रहायचं होतं. त्यामुळे तिने लग्न करण्यापूर्वी सैफसमोर अशीच अट ठेवली होती. एका मुलाखतीदरम्यान तिने सैफला जोडीदार म्हणून का निवडलं या मागचं कारण सांगितलं. ती म्हणाली की, ‘मला स्वावलंबी राहणं जास्त आवडतं. लग्नानंतरही मला चित्रपटात काम करायचं आहे. पत्नी किंवा आई झाल्यानंतरही माझ्या करिअरवर त्या गोष्टींचा कोणताच परिणाम होता कामा नये असं मला वाटतं.’

या अटीसंदर्भात ती पुढे म्हणाली की, ‘मला आयुष्यभर पैसे कमवायचे आहेत. लग्नानंतरही चित्रपटसृष्टीत करिअर करणार असल्याची अट मी सैफसमोर ठेवली. या गोष्टीला त्याचा नकार नव्हता, म्हणून मी लग्नासाठी तयार झाले.’ अटीप्रमाणेच करिना लग्नानंतरही बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 8:00 am

Web Title: kareena kapoor gave this condition to marry saif ali khan ssv 92
Next Stories
1 ऑस्कर विजेत्या वेशभूषाकार भानू अथय्या कालवश
2 Ridiculous! बॉलिवूड शब्दही हॉलिवूड शब्दावरुन चोरलाय, कंगनाचं पुन्हा टिकास्त्र
3 सुशांत प्रकरणाची चौकशी CBI थांबवणार नाही; कारण…
Just Now!
X