18 September 2020

News Flash

करीना कपूर ‘डॉक्टर’!

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर ‘उडता पंजाब’ या आगामी चित्रपटात पुन्हा एकदा ‘डॉक्टर’च्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

| June 13, 2015 02:46 am

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर ‘उडता पंजाब’ या आगामी चित्रपटात पुन्हा एकदा ‘डॉक्टर’च्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या एका रुग्णावर उपचार करताना करीना कपूर ‘डॉक्टर’ म्हणून काम करीत आहे.
करीना कपूर पहिल्यांदा ‘डॉक्टर’ची भूमिका करीत नसून याअगोदरही तिने बॉलीवूडच्या ‘कम्बत इश्क’ आणि ‘थ्री इडियट’ या चित्रपटांत डॉक्टरची भूमिका केली होती. ‘उडता पंजाब’ चित्रपटात आलिया भट्ट एका ‘ड्रग अ‍ॅडिक्ट’च्या भूमिकेत आहे. करीनासोबत या चित्रपटात शाहिद कपूर, पंजाबी अभिनेता दिलजित दोसझ हेही आहेत.चित्रपटाचे काही चित्रीकरण अद्याप बाकी असून चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक चौबे यांचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 2:46 am

Web Title: kareena kapoor in doctor role
Next Stories
1 विद्या बालनचे आगळे रूप!
2 धर्मेंद्र-हेमा मालिनी झाले आजी-आजोबा
3 मनवा-भूषणची जोडी जमली रे!
Just Now!
X