‘मेहँदी है रचनेवाली, हाथों में गहरी लाली,’ हे गाणं आजही लग्नात मेंदीच्या कार्यक्रमात लावलं जातं. करिश्मा कपूरवर चित्रीत झालेलं हे गाणं ‘जुबैदा’ या चित्रपटातील आहे. शाम बेनेगल दिग्दर्शित हा चित्रपट २००१ रोजी प्रदर्शित झाला होता. त्याकाळी या चित्रपटातलं प्रत्येक गाणं सुपरहिट झालं होतं. त्यामुळे आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. सध्या बॉलिवूडमध्ये चित्रपटांच्या रिमेकचा ट्रेण्ड असल्याचं पाहायला मिळतंय. याच ट्रेण्डमध्ये आता ‘जुबैदा’चादेखील रिमेक येणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या चिपटाच्या माध्यमातून पहिल्यांदा कपूर कुटुंबातील दोन कन्या एकत्र काम करणार आहेत.

बॉलिवूडमध्ये कपूर कुटुंबाचं फार मोठं योगदान आहे. या कुटुंबातील अनेक पिढ्या कलाविश्वात सक्रीय आहेत. ऋषी कपूर, शम्मी कपूर यांच्यानंतर करिश्मा कपूर, करीना कपूर -खान आणि रणबीर कपूर या तरुण पिढीने कपूर कुटुंबाचा वारसा पुढे जतन केला आहे. करिश्मा आणि करीना यांच्या अफाट लोकप्रियतेबद्दल फार काही सांगण्याची आवश्यकता नाही. या दोघी सख्या बहिणी असून त्यांनी स्वकर्तृत्वावर कलाविश्वात स्वत:च स्थान भक्कम केलं आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत अनेक चित्रपटामध्ये झळकलेल्या या दोघी बहिणींनी एकाही चित्रपटामध्ये स्क्रीन शेअर केली नाही. मात्र जुबैदाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ही जोडी एकत्र झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

‘पिंकव्हिला’नुसार, करिश्मा कपूर हिची मुख्य भूमिका असलेल्या ‘जुबैदा’चा लवकरच रिमेक करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाचे लेखक खालिद मोहम्मद हे चित्रपटाच्या रिमेकची योजना आखत आहेत. खालिद यांनी एका मुलाखतीमध्ये चित्रपटाच्या रिमेक करण्याविषयीचं मत व्यक्त केलं. तसंच ते ‘इम्पेरफेक्ट प्रिंस’ ही कादंबरी लिहीत असून त्यातून ‘जुबैदा’च्या सीक्वलमधील कथेची आणि पात्रांची ओळख करुन देणार आहेत.

 

View this post on Instagram

 

@therealkarismakapoor

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

”जुबैदा’च्या रिमेकमध्ये करिश्मा आणि करीनाला एकत्र पाहण्याची माझी इच्छा आहे. तसंच मला या चित्रपटासाठी एक असा दिग्दर्शक हवा ज्याचे विचार माझ्या विचारांशी जुळतील. तसंच संस्कृती आणि परंपरा यांचं महत्त्व जाणणारे फार कमी व्यक्ती राहिले आहेत, त्यातलंच एक नाव म्हणजे श्याम बेनेगल”, असं खालिद यांनी म्हटलं.

वाचा : ‘माझ्या नवऱ्याचं नंदिता दाससोबत अफेअर होतं’; ‘लगान’मधील अभिनेत्यावर पत्नीचा आरोप

पुढे ते म्हणतात, “जर या चित्रपटासाठी करिश्मा आणि करीनाने होकार दिला तर हा चित्रपट तुफान लोकप्रिय होईल. इम्पेरफेक्ट प्रिंसमधील पात्रांच्या यादीत त्यांनी अभिनेत्री रेखा, अनिल कपूर, करिश्मा कपूर आणि करीना कपूर यांच्या नावाचा विचार केला आहे”.

पाहा : Photo : मृण्मयी देशपांडेची ग्लॅमरस बहीण

दरम्यान, २००१ मध्ये ‘जुबैदा’ या चित्रपटाने विशेष लोकप्रियता मिळविली होती. या चित्रपटात करिश्मा कपूर, रेखा, मनोज वाजपेयी हे मुख्य भूमिकेत झळकले होते. या चित्रपटात करिश्माने जुबैदा बेगम ही भूमिका साकारली होती. तिचं लग्न महाराजा विजयेंद्र सिंह यांच्याशी झालं होतं. तर मनोज वायपेयीने विजयेंद्र सिंह यांची भूमिका वठविली होती.