News Flash

फोटो : करिनाचा लेकासोबत हा फोटो पाहिलात का?

या फोटोतील तैमुरचे गोड हास्य हे सर्वांचे लक्ष वेधत आहे.

करिना कपूर खान आणि तिचा लाडका लेक तैमुर अली खान यांचा एक सुंदर फोटो समोर आला आहे.

बॉलीवूडची बेबो करिना कपूर खान आणि डिसेंबर महिन्यात जन्मलेला तिचा मुलगा तैमुर अली खान हा त्याच्या जन्मापासूनच सगळ्यांचे लक्ष वेधत आहे. त्याच्या जन्माच्या अगदी काही तासांनंतरच रुग्णालयातील त्याचा पहिला फोटो लीक झाला होता. त्यानंतर या छोट्या नवाबाचे काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले होते. इतकेच नव्हे, तर करिना आणि तिच्या बाळाला रुग्णालयातून घरी पाठवल्यानंतर लगेचच सैफिनाने त्यांच्या बाळासह प्रसारमाध्यमांतील छायाचित्रकारांना फोटोसाठी पोज दिली होती. या नव्या स्टार किडचे छायाचित्रकारांनीही बरेच फोटो काढत त्याचे स्वागत केले होते. दोन दिवसांपूर्वीच करिना तैमुरसोबत बाहेर जाताना दिसली होती. त्यांचे फोटो सोशल मिडीयावर तेव्हाही प्रसिद्ध झाले होते.

दरम्यान, आज करिना कपूर खान आणि तिचा लाडका लेक तैमुर अली खान यांचा एक सुंदर फोटो समोर आला आहे. या फोटोत करिना तैमुरच्या डोक्याचे चुंबन घेताना दिसते. मात्र, या फोटोतील तैमुरचे गोड हास्य हे सर्वांचे लक्ष वेधत आहे. तैमुरचा जन्म २० डिसेंबर २०१६ रोजी झाला होता.

काही दिवसांपूर्वीच झालेल्या एका मुलाखतीत करिनाला तिच्या मातृत्वाच्या अनुभवाबद्ल विचारण्यात आले होते. यावर करिना म्हणालेली की, आई झाल्यावर तुमच्या जबाबदाऱ्या वाढतात. तुमच्या शरीराच्या आत नव्हे तर शरीराबाहेर हृदयाची स्पंदन होत असतात आणि हीच तुमची सर्वात मोठी जबाबदारी असते. मला आणि सैफला ही जबाबदारी नेहमीच हवी होती. आम्ही दोघंही स्वतःला तैमुरमध्ये बघतो. तो आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आहे.

तैमुरच्या जन्मापूर्वी दिग्दर्शक अभिषेक चौबेच्या ‘उडता पंजाब’ चित्रपटात दिसलेली करिना आता लवकरच ‘वीरे दी वेडिंग’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांका घोष करत असून यात सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया या अभिनेत्रीदेखील पाहावयास मिळतील. सैफ अली खानच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो नुकताच दिग्दर्शक विशाल भारद्वाजच्या रंगून या चित्रपटात झळकला होता. यात सैफसोबत शाहिद कपूर आणि कंगना रणौत यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 5:47 pm

Web Title: kareena kapoor khan and baby taimurs candid photo will make your day
Next Stories
1 ‘फुकरे रिटर्न’चे पहिले पोस्टर प्रदर्शित
2 आमिरने ‘दंगल’मधून कमविले १७५ कोटी?
3 नानावटीतील डॉक्टरांमुळे वाचले अब्रामचे प्राण
Just Now!
X