05 August 2020

News Flash

तैमुरमुळे सैफ-करीना झाले मालामाल; केला इतक्या कोटींचा करार

अवघ्या तीन वर्षांच्या तैमुर अली खानचं स्टारडम एखाद्या सुपरस्टारइतकंच आहे.

अवघ्या तीन वर्षांच्या तैमुर अली खानचं स्टारडम एखाद्या प्रसिद्ध सुपरस्टारइतकंच आहे. तैमुरचे फोटो टिपण्यासाठी फोटोग्राफर्सची गर्दी जमते. त्याचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. फोटोग्राफर्स त्याचे फोटो क्लिक करुन मीडिया हाऊसला विकत असतात. या फोटोंनाही इतर कलाकारांच्या तुलनेत सर्वाधिक रक्कम मिळते. आता तैमुरमुळे त्याचे आईबाबा म्हणजेच सैफ अली खान आणि करीना कपूर मालामाल झाले आहेत. या दोघांनीही नुकताच एका जाहिरातीचा करार स्वीकारला असून त्यासाठी त्यांना चांगले मानधन मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

‘मिड डे’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, एका प्रसिद्ध डायपर कंपनीची जाहिरात करण्यासाठी सैफ-करीनाने होकार दिला आहे. सुरुवातीला त्यांनी या जाहिरातीत झळकण्यास नकार दिला होता. ही कंपनी जवळपास वर्षभरापासून सैफ-करीनाकडे विनंती करत होती. अखेर पुनर्विचार करून सैफ-करीनाने होकार कळविला आहे. विशेष म्हणजे फक्त तीन ते चार तासांसाठी त्यांना तब्बल दीड कोटी रुपये मिळत आहेत. या जाहिरातीत त्यांच्यासोबत तैमुरसुद्धा असण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : ..म्हणून शाहरुखने ‘करण-अर्जुन’ प्रदर्शित झाल्यानंतर राकेश रोशन यांची मागितली माफी

तैमुर कुठेही दिसला तरी प्रसारमाध्यमांच्या नजरा त्याच्याकडेच वळतात. सैफ आणि करीना जरी त्याच्यासोबत असले तरी चर्चा फक्त तैमुरचीच होते. त्यामुळे त्याची ही पहिली जाहिरात नक्कीच चर्चेचा विषय ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 1:09 pm

Web Title: kareena kapoor khan and saif ali khan to get whopping amount for diaper ad ssv 92
Next Stories
1 Oscar 2020 : नायक नव्हे खलनायकाचा दबदबा; ‘जोकर’ला ११ नामांकनं
2 ..म्हणून शाहरुखने ‘करण-अर्जुन’ प्रदर्शित झाल्यानंतर राकेश रोशन यांची मागितली माफी
3 उत्तर प्रदेश सरकारकडून ‘तान्हाजी’ चित्रपट टॅक्स फ्री, महाराष्ट्रात कधी ?
Just Now!
X