News Flash

विरूष्कानंतर सैफ-करीनाने घेतला बाळासाठी महत्त्वाचा निर्णय?

करीना आणि सैफ यांच्या दुसऱ्या मुलाचा जन्म २१ फेब्रुवारी रोजी झाला.

सेलिब्रिटीं व्यतिरीक्त चाहत्यांना सगळ्यात जास्त उत्सुकता ही स्टारकिड्स बद्दल असते. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. त्यात आता बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खान यांना दुसऱ्यांदा मुलगा झाला आहे. सगळ्यांचे लक्ष हे त्यांच्या मुलाकडे आहे. मात्र, विरूष्का पाठोपाठ आता करीना आणि सैफ त्यांच्या मुलाला मीडियापासून लांब ठेवणार आहेत अशा चर्चा सुरू आहेत.

स्पॉटबॉटने दिलेल्या वृत्तानुसार, सैफ आणि करीनाच्या जवळच्या मित्राने यावर वक्तव्य केलं आहे. “हा फक्त एक अनुमान आहे. पण मीडियाला आता चांगलं ठाऊक आहे की, तैमूरचा भाऊ म्हंटलं की काहीही खपेल. त्यामुळे ते सैफ- करीना आणि त्यांच्या बाळाच्या निरर्थक बातम्या ते छापतील. म्हणून सैफ आणि करीनाने त्यांच्या बाळाला मीडियापासून लांब ठेवण्याच ठरवलं आहे.” असं त्यांच्या मित्राने सांगितलं आहे.

पुढे तो म्हणाला, “तैमूरच्या भावाला तुम्हाला पाहता येणार नाही. खरं तर जेव्हा तो थोडा मोठा होईल तेव्हा त्याला तैमूर सारखं सगळ्यांसमोर आणलं जाणार नाही. मला वाटतं की करीना आणि सैफ यांना त्यांचा धडा मिळालेला आहे. मुलांचे फोटो काढण्यासाठी तुम्ही मीडियाला जेवढी परवाणगी द्याल तितका जास्त त्रास ते देतील. तर, करीनाच दुसर बाळ तुम्हला खेळताना, चित्रकाढताना किंवा काहीही करताना दिसणार नाही. ”

करीनाने दुसऱ्यांदा मुलाला जन्म दिला. वांद्रे इथल्या ब्रीज कॅण्डी रुग्णालयात बाळाला जन्म दिला. करीना कपूरच्या बाळाच्या आगमनाच्या बातमीकडे सगळ्यांचं लक्ष होतं. सोशल मीडियावर करीना कपूर तिच्या गरोदरपणातील हटके लूकने कायम व्हायलर होताना पाहायला मिळाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 11:35 am

Web Title: kareena kapoor khan and saif ali khan will introduce their sencond child dcp 98
Next Stories
1 78 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांचा व्हर्च्युअल सोहळा, कुणी कोरलं पुरस्कारांवर नाव?
2 अनिल कपूर ‘त्याचा’ जीवच घेणार होते पण.. शेअर केला सिनेमाच्या सेटवरचा किस्सा
3 इसाबेल कैफच्या ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटाचा पोस्टर शेअर करत, सलमान म्हणाला…
Just Now!
X