27 February 2021

News Flash

Box Office Collection: ‘वीरे दी वेडिंग’ने एका दिवसांत केली एवढ्या कोटींची कमाई

पहिल्या दिवसाच्या कलेक्शनने या सिनेमाने चक्क दोन सिनेमांना मागे टाकले आहे.

वीरे दी वेडिंग

करिना कपूर आणि सोनम कपूर यांच्या ‘वीरे दी वेडिंग’ सिनेमाचा रिव्ह्यू पाहता सिनेमात निर्मात्यांनी केलेली गुंतवणूकही भरून निघणार नाही असे म्हटले जात होते. पण सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. पहिल्या दिवसाच्या कलेक्शनने या सिनेमाने चक्क दोन सिनेमांना मागे टाकले आहे.

‘वीरे दी वेडिंग’चे एकूण बदेट ३० कोटी एवढे आहे. सिनेव्यापार विश्लेषक यांनी सिनेमाचे पहिल्या दिवशीचे कलेक्शन सोशल मीडियावर शेअर केले आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी १०.७० कोटींचे कलेक्शन केले आहे. सिनेसमिक्षकांनी या सिनेमाबद्दल फार काही चांगले लिहिले नव्हते. तसेच सिनेमा चांगली कमाई करु शकेल का याबद्दलही प्रश्न उपस्थित केला होता.

पहिल्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये सिनेमाने अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ आणि अजय देवगणच्या ‘रेड’ सिनेमाला मागे टाकले आहे. ‘पॅडमॅन’चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन १० कोटी २६ लाख रुपये होते. तर ‘रेड’ने पहिल्या दिवशी १० कोटी ४ लाखांची कमाई केली होती. आता पहिल्याच दिवशी सिनेमाने १० कोटींपेक्षा जास्त कमाई केल्यामुळे विकेण्डला हा सिनेमा त्याहून जास्त कमाई करेल असेच म्हटले जात आहे. तैमुरच्या जन्मानंतर करिनाचा हा पहिलाच सिनेमा आहे. शशांक घोष दिग्दर्शित या सिनेमात करिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा यांच्या मुख्य भूमिका आहेत. चार मैत्रिणींच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 1:57 pm

Web Title: kareena kapoor khan and sonam kapoor film veere di wedding box office collection day 1
Next Stories
1 ….म्हणून ‘वीरे दी वेडिंग’ एकदा पाहाच!
2 बॉलीवूड म्हणणं बंद करा, हे तर गुलामगिरीचं प्रतीक – भाजपा नेता
3 रेस ३ : ‘या’ नव्या गाण्याला २४ तासातच मिळाले लाखो व्ह्युज
Just Now!
X