News Flash

‘बस करो भाई क्यूँ इतनी इज्जत दे रहे हो’; करीनाचं वागणं पाहून संतापले नेटकरी

करीनाचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

(Photo Credit: Viral bhayani Instagram Video)

दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान पुन्हा कामावर रुजू झाली आहे. ती सतत कुठे ना कुठे जाताना दिसत असते. सध्या सोशल मीडियावर करीनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील तिचे वागणे पाहून नेटकरी संतापले आहेत. त्यांनी करीनाला ट्रोल केले आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यांनीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर करीनाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये करीना एका बिल्डींमधून बाहेर पडते आणि कारमध्ये जाऊन बसत असल्याचे दिसत आहे. दरम्यान तेथे उपस्थित असलेले फोटोग्राफर तिला थांबून फोटोसाठी पोज देण्यास सांगतात. पण करीना त्यांचे ऐकून न ऐकल्यासारखे करुन तेथून निघून जाते.

करीनाचं आलिशान सासर : ८०० कोटींचा पतौडी पॅलेस आतून कसा दिसतो पाहिलात का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Video: फोटोग्राफरवर ओरडला तैमूर अन्…, करीना कपूर झाली रागाने लाल

करीना कारच्या दिशेने जात असताना एक फोटोग्राफर तिला म्हणतो, ‘करीना मॅडम, एक मिनिट. मॅडम थांबा ना. खूप वेळापासून आम्ही इथे थांबलो आहोत’ असे बोलताना दिसतो. पण करीना एक सेकंद देखील तेथे थांबत नाही.

करीनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओमधील करीनाची वागणूक पाहून नेटकरी संतापले आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत ‘बस करा. कशाला तिला इतकी इज्जत देता. ती तुम्हाला इज्जत देत नाही’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘ती खूप उद्धट महिला आहे’ असे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 4:27 pm

Web Title: kareena kapoor khan brutally trolled for her attitude video viral on internet avb 95
Next Stories
1 महाराष्ट्राच्या लेकींची सुरेल मेजवानी; ‘सूर नवा ध्यास नवा’चं नवं पर्व
2 ‘हेरा फेरी’ला २१ वर्षे पूर्ण, सुनील शेट्टी-अक्षय कुमारने पोस्ट शेअर करताच मीम्सचा पाऊस
3 अनुष्काचा चित्रपटसृष्टीला रामराम?; सिमी गरेवालच्या त्या मुलाखतीमळे चर्चा
Just Now!
X