News Flash

“कोला शोला सब अपनी जगह”; रोनाल्डोच्या अनेक वर्ष आधीच करीना कपूर Coca-Cola बद्दल म्हणाली होती…

सगळ्यांची लाडकी बेबो म्हणजेच करीना कूपर खानने कोको कोला ऐवजी पाणी पिण्यालाच पसंती दिली होती.

(photo-you tube/Reuters, NYT)

पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने पत्रकार परिषदेदरम्यान कोका कोलाच्या बाटल्या बाजूला करून पाण्याला पंसती दिल्याचा व्हिडीओ सध्या सर्वत्र गाजतोय. कोका कोला सारख्या थंड पेयाला पसंती न देता रोनाल्डोने पाणी प्या असा सल्ला देत कोका कोलाच्या बाटल्या बाजूला सारल्या.

तंदुरुस्तीसाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या युव्हेंटसचा किमयागार आक्रमक ३६ वर्षीय रोनाल्डोने पत्रकार परिषदेत त्याच्या पुढय़ातील कोका-कोलाच्या दोन बाटल्या उचलून दूर ठेवल्या आणि पाण्याची बाटली जवळ ठेवली. ही कृती करताना रोनाल्डोने पोर्तुगीज भाषेत ‘‘एगुआ’’ म्हणजेच ‘‘पाणी प्या’’ असा संदेश दिला. रोनाल्डोच्या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पत्रकार परिषदेतील रोनाल्डोच्या या एका कृतीमुळे कोका कोला कंपनीचे शेअर्स घसरल्याने कंपनीला तब्बल चार बिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास २९ हजार ३५२ कोटींचं नुकसान झालं आहे.

पण तुम्हाला माहित आहे का ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या ही आधी आपली सगळ्यांची लाडकी बेबो म्हणजेच करीना कूपर खानने कोको कोला ऐवजी पाणी पिण्यालाच पसंती दिली होती. ‘जब बी मेट’ सिनेमातील चुलबुली गीत तर सगळ्यांच्याच लक्षात असेल. करीनाची आजवर सर्वाधिक गाजलेली ही भूमिका आहे. या सिनेमातील एक सर्वात महत्वाचा सीन सगळ्यांच्या लक्षात असेल तो म्हणजे जेव्हा करीनाची म्हणजेच सिनेमातील गीतची रतलाम स्थानकावर ट्रेन सुटते. या सीनच्या सुरुवातीला गीत पाणी पिण्यासाठी रतलाम स्टेशनवर उतरते आणि तिथल्या स्टॉलवरील विक्रेत्याकडे पाणी मागते. यावेळी तहानलेली गीत म्हणते, “कोला शोला सब अपनी जगह है..पर पानी का काम पानी ही करता है”

हे देखील वाचा: अक्षय कुमारमुळे ट्विंकल खन्नाला झाली होती अटक; चारचौघांत करायला लावलं होतं ‘ते’ कृत्य

हे देखील वाचा:रोनाल्डोच्या कृतीमुळे कोका-कोला कंपनीला चार अब्ज डॉलरचा फटका

या सीनमध्ये पाणी प्यायल्यानंतर गीत विक्रेत्यासोबत पाण्याच्या बॉटलच्या किमतीवरून वाद घातलते आणि यातच तिची ट्रेन सुटते. इथूनच सिनेमाच्या खऱ्या कथेला सुरुवात होते.

रोनाल्डोच्या या व्हायरल व्हिडीओमुळे आता ‘जब वी मेट’ या सिनेमातील गीतच्या व्हिडीओला देखील लोकांची पसंती मिळत असून हा व्हिडीओ व्हायरल होवू लागला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 3:45 pm

Web Title: kareena kapoor khan endorsed water before portugal footballer cristiano ronaldo removed coca cola kpw 89
Next Stories
1 ‘कोणी तरी मला स्पर्श करत असल्याचा भास झाला’, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव
2 Rajmata Jijabai Death Anniversary 2021: पडद्यावरील ‘जिजाबाई’
3 अक्षय कुमारमुळे ट्विंकल खन्नाला झाली होती अटक; चारचौघांत करायला लावलं होतं ‘ते’ कृत्य
Just Now!
X