News Flash

‘तुम्ही सर्व जबाबदार आहात..’, करोना नियम मोडणाऱ्यांवर संतापली करीना

तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

देशात करोनाचा संसर्ग वाढतोय. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत होणारी वाढ चिंता वाढवणारी आहे. देशातील करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका अनेकांना बसत आहे. अशातच अनेक कलाकार सर्वांना मास्क लावा, सॅनिटायझर वापरा असे आवाहन करत आहेत. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने सोशल मीडिया पोस्टद्वारे मास्क न वापरणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.

करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘मला अजूनही कळत नाही लोक इतके निष्काळजीपणे कसे वागू शकतात. सध्या आपल्या देशात काय परिस्थिती आहे याची त्यांना कल्पना असूनही ते असे कसे वागू शकतात. तुम्ही घराबाहेर पडाताना योग्य पद्धतीने मास्क लावणे गरजेचे आहे. परंतु अनेक जण चुकीच्या पद्धतीने ते लावला आणि करानो नियमांकडे दुर्लक्ष करतात. अशा पद्धतीने वागणाऱ्यांनी एकदा दिवसरात्र करोनाविरोधात लढणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांबाबत विचार करायला हवा’ असे करीना म्हणाली.

आणखी वाचा- व्हिडीओ शेअर करत प्रियांका चोप्रा म्हणाली; “माझ्या देशात सध्या…”

पुढे ती म्हणाली, ‘डॉक्टर आता शारिरीक आणि मानसिक पातळीवर प्रचंड दमले आहेत. तुम्ही सर्वजण करोनाची चेन तोडण्यासाठी जबाबदार आहात.’ करीनाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2021 1:29 pm

Web Title: kareena kapoor khan gets angary on people who break corona norms avb 95
Next Stories
1 व्हिडीओ शेअर करत प्रियांका चोप्रा म्हणाली; “माझ्या देशात सध्या…”
2 ‘शाहरुखने माझे आयुष्य उध्वस्त केले’, तरुणीने केला मजेशीर आरोप
3 पुन्हा एकदा बहरणार प्रेमाचे रंग; पुन्हा भेटीला येणार लोकप्रिय मालिका ‘जिवलगा’
Just Now!
X