21 September 2020

News Flash

साराच्या करिअरमध्ये करिना करतेय अशी मदत

सध्या करिना तिच्या करिअरबरोबरच साराच्या करिअरकडेदेखील तेवढ्याच लक्ष देत असल्याचं दिसून येत आहे.

तैमूरच्या जन्मानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सक्रिय झालेल्या करिना कपूरचा ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई केली असून त्यातील काही सीनमुळे या चित्रपट जास्त चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र असं असंल तरी करिनाच्या कमबॅकचं चांगलंच कौतुक करण्यात येत आहे. सध्या करिना तिच्या करिअरबरोबरच लेकीच्या साराच्या करिअरकडेदेखील तेवढ्याच जातीने लक्ष देत असल्याचं दिसून येत आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिडची चलती असल्याचं दिसून येत आहे. अनेक स्टारकिड बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या मार्गावर असून दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी हिचा ‘धडक’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्या पाठोपाठ सैफ अली खानच्या मुलीचा सारा खानचा ‘केदारनाथ’ हा चित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर असल्याचं दिसून येत आहे. मात्र, या चित्रपटात साराने केलेल्या मेकओव्हरमुळे तिची सावत्र आई करिना थोडीशी नाखूश असल्याचं दिसून आलं.

‘केदारनाथ’ चित्रपटात साराने केलेल्या मेकओव्हरमुळे साराच्या सौंदर्यामध्ये अडथळा येत असल्याचं करिना कपूरला जाणवत होतं. त्यामुळे करिनाने साराच्या मेकअपबाबतीत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. सारा आगामी ‘सिंबा’ चित्रपटात चांगली दिसावी यासाठी करिनाने तिच्या खास मेकअपमॅनला साराचा मेकओव्हर करण्यास सांगितलं आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पॉम्पी हंस हे करिनाचे हेअर आणि मेकअप स्टायलिस्ट म्हणून काम करत आहेत. त्यांची मेकअप करण्याची पद्घत उत्तम असल्याने करिनाने यापुढे साराच्या मेकअपही त्यांनाच करायला सांगितला आहे. एखाद्या अभिनेत्रीला यशाचं शिखर गाठायचं असेल तर तिला तिचा लूक आणि स्टाईल याकडे सर्वाधिक लक्ष द्यावं लागतं. या दोन्ही गोष्टी अभिनेत्रींसाठी महत्वाच्या असतात. त्यामुळे साराच्या करिअरची सुरुवात चांगल्या मार्गाने व्हावी या इच्छेखातर करिनाने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे ‘सिंबा’ चित्रपटापासून पुढील प्रत्येक चित्रपटामध्ये साराचा मेकओव्हर पॉम्पी हंस यांच्याकडूनच करण्यात येणार असल्याच स्पष्ट दिसून येत आहे.

दरम्यान, साराच्या आगामी ‘सिंबा’चं चित्रीकरण येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये सुरु होणार असून या चित्रपटामध्ये रणवीर सिंह तिच्याबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे. तर तिचा ‘केदारनाथ’ हा चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 1:28 pm

Web Title: kareena kapoor khan helping sara ali khan
Next Stories
1 Video: वयाने मोठ्या महिलेला का डेट करतोय निक; त्यानेच केला खुलासा
2 ब्लॉग- ‘मधुबाला’ कोणी साकारावी?
3 टॉपलेस फोटोपेक्षा इलियानाने लिहिलेलं कॅप्शन ठरतंय चर्चेचा विषय
Just Now!
X