05 December 2019

News Flash

ठरलं! अंग्रेजी मीडियममध्ये इरफानसोबत झळकणार ‘ही’ अभिनेत्री

चित्रपटाचे दिग्दर्शन होमी अडजानिया करणार असून निर्मिती दिनेश विजन करणार आहेत

गेल्या वर्षभरापासून न्यूरोएन्डोक्राईन कर्करोगाशी लढा देत असलेला अभिनेता इरफान खानच्या तब्येतीत सुधारणा होताच ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाची घोषणा झाली होती. चाहते इरफानला पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी फार उत्सुक आहेत. तसेच हिंदी मीडियम’चा सीक्वल असलेल्या ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटात इरफानसह कोणती अभिनेत्री दिसणार याची सर्वत्र चर्चा होती.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘अंग्रेजी मीडिय’ या चित्रपटात इरफानसह अभिनेत्री करिना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे ट्विटरद्वारे सांगितले आहे. तसेच ती पोलिसाची भूमिका साकारणार असल्याचेही सांगितले आहे. ‘करिना कपूर खान अंग्रेजी मीडियम चित्रपटात इरफान खानसह काम करणार आहे. तसेच चित्रपटात ती पोलिसाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन होमी अडजानिया करणार असून निर्मिती दिनेश विजन करणार आहेत. अंग्रेजी मीडियम चित्रपटाचे चित्रीकरण जूनमध्ये लंडनमध्ये होणार आहे’ असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले होते.

याआधी चित्रपटातील इरफानचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता. या फोटोमध्ये इरफान एका मिठाईच्या दुकानाबाहेर उभा राहिला असून, त्याचा लूक चित्रपटाच्या कनथाकाविषयी विचार करण्यास भाग पाडत आहे. सध्या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थानमध्ये सुरु आहे.

२०१७ साली ‘हिंदी मीडियम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. भारत नाही तर चीनमध्येही या चित्रपटाला मोठे यश मिळाले होते. त्यानंतर या चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा करण्यात आली मात्र इरफानच्या तब्येतीमुळे सीक्वलचे चित्रीकरण लांबले. ‘अंग्रेजी मीडियम’ हा हिंदी मीडियमच्या सीक्वल असला तरी यात वेगळी गोष्ट पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार असल्याचे समजत आहे.

First Published on April 25, 2019 1:29 pm

Web Title: kareena kapoor khan playing role in angrezi medium with irrfan khan
Just Now!
X