बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरने १६ ऑक्टोबर २०१२ मध्ये सैफ अली खानसोबत लग्नगाठ बांधली. या दोघांमध्ये तब्बल १० वर्षांचं अंतर असून ही जोडी कलाविश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. आजही त्यांच्या नात्यातील विश्वास आणि प्रेम कायम असल्यामुळे हे नातं दृढ आहे. या दोघांना तैमुर हा लहान मुलगा आहे. तैमुरची लोकप्रियता एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. आज तैमुर लोकप्रिय स्टारकिडपैकी एक आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर असतात. विशेष म्हणजे करिनाला पहिल्यांदाच प्रेग्नंट असल्याची चाहूल लागल्यानंतर तिने ही गोष्ट एका खास व्यक्तीला प्रथम सांगितली होती. या कार्यक्रमादरम्यान करिनाने या व्यक्तीच्या नावाचा खुलासा केला.

करिना लवकरच ‘गुड न्यूज’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटामध्ये ती एका गर्भवती मुलीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाचं प्रमोशन सुरु असून या दरम्यान तिला तिच्या प्रेग्नंसी काळातल्या काही आठवणी विचारल्या होत्या. यावेळी प्रश्नांची उत्तर देताना तिने गर्भवती असल्याची पहिली माहिती कोणत्या व्यक्तीला दिली होती हे सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by saif ali khan (@saif_alikan) on

“मी प्रेग्नंट असल्याचं समजल्यानंतर प्रथम ही माहिती मी सैफलाच सांगितली होती. त्यानंतर घरातल्या अन्य सदस्यांना सांगितलं. तसंच तैमुरचं नावदेखील आम्ही आधीच ठरवून ठेवलं होतं”, असं करिनाने यावेळी बोलताना सांगितलं.

दरम्यान, करिनाच्या बाळाचं नाव तैमुर ठेवल्यामुळे त्यावेळी प्रचंड वाद निर्माण झाला होता. अनेकांनी या नावाचा विरोध केला होता. मात्र अनेकांचा विरोध पत्करुन हे जोडपं आपल्या लेकाचं नाव तैमुरचं ठेवणार असल्याच्या निर्णयावर ठाम राहिले.