News Flash

सारा-कार्तिकच्या अफेअरच्या चर्चांवर करीनाचं मजेशीर उत्तर

करीना कपूरला इंडस्ट्रीतील सर्व गॉसिप माहित असतं असं म्हणतात.

करीन कपूर, सारा अली खान, कार्तिक आर्यन

अभिनेत्री करीना कपूरला इंडस्ट्रीतील सर्व गॉसिप माहित असतं असं म्हणतात. कोण कोणाला डेट करतंय, कोणामध्ये भांडणं सुरु आहेत, याची बित्तंबातमी करीनाला माहित असते. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खानच्या अफेअरविषयी तिला काय माहित आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न एका मुलाखतीत केला गेला. त्यावर तिने मजेशीर उत्तर दिलं.

‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत करीनाला सारा आणि कार्तिक आर्यन यांच्या अफेअरच्या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे असा प्रश्न विचारला गेला. त्यावर ती सुरुवातीला म्हणाली, “मला खरंच त्याविषयी माहित नाही, कारण दोघांनीही मला काहीच सांगितलं नाही.” त्यानंतर तिने तिच्या मुलाखतीतला कार्तिकचा किस्सा सांगितला. करीनाच्या ‘व्हॉट व्हूमन वाँट’ या चॅट शोमध्ये कार्तिक आर्यनने हजेरी लावली होती. त्यावेळी त्याला साराविषयी प्रश्न विचारल्याचं करीनाने सांगितलं. “मी सुद्धा त्याला हाच प्रश्न विचारला होता. पण तो म्हणाला मी माझ्या कामाला डेट करत आहे. हे ऐकून पुढे मला काही सुचलंच नाही,” असं करीना म्हणाली.

आणखी वाचा : सैफच्या ‘या’ सवयीला करीना वैतागली; लग्नाच्या सात वर्षांनंतर केला खुलासा

सारा आणि कार्तिक बऱ्याचदा एकत्र दिसतात, पण त्यांनी अद्यापही रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली प्रसारमाध्यमांना दिली नाही. हे दोघं लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. चित्रपटात या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2020 10:41 am

Web Title: kareena kapoor khan reacts to rumours of sara ali khan and kartik aaryan affair ssv 92
Next Stories
1 ‘मार लो डंडे, कर लो दमन…’; स्वानंद किरकिरेंची मनाला भिडणारी कविता
2 #JNURow: दीपिका एक शब्दही न बोलता निघून गेली, आयेषी घोष म्हणते….
3 सर्वकाही ठीक आहे असं भासवणं आता बंद केलं पाहिजे- आलिया भट्ट
Just Now!
X