01 March 2021

News Flash

दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर करीनाने केली पहिली पोस्ट…

कोणासाठी करीनाने केली पहिली पोस्ट? जाणून घ्या...

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई झाली आहे. रविवारी वांद्रे येथील ब्रीज कॅण्डी रुग्णालयात करीनाला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सैफ अली खानने मुलगा झाल्याची गोड बातमी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. आज करीनाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर करीनाने सोशल मीडियावर पहिल्यांदा पोस्ट शेअर केली आहे. करीनाची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट तिने पती सैफ अली खानसाठी केली आहे. या पोस्टमध्ये तिने सैफचा आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूत पोलीस’चे पोस्टर शेअर केले आहे. अभिनेता सैफ अली खान, अर्जुन कपूर, अभिनेत्री यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिस या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पोस्टरमध्ये सगळे कलाकार उभे असून कॅमेराकडे त्यांची पाठ आहे. त्या चौघांच्या हातात शस्त्र दिसत आहे. थोड्या अंतरावर हॉन्टेड हाऊस दिसत आहे. “किंचाळण्यासाठी आणि हसण्यासाठी तयार रहा” अशा आशयाचे कॅप्शन करीनाने ते पोस्टर शेअर करत दिले आहे.

‘भूत पोलीस’ हा चित्रपट १० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, हिमाचलमधील धर्मशाळा, जैसलमेरसारख्या अनेक ठिकाणी झाले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 5:53 pm

Web Title: kareena kapoor khan shared a first post after giving birth to her second child dcp 98 avb 95
Next Stories
1 ‘हसण्यासोबतच घाबरण्यासाठी तयार रहा’; भूत पोलिस येत आहे!
2 करीना रुग्णालयातून परतली घरी; समोर आला व्हिडीओ
3 ‘देसी गर्ल’ गाण्यावर आराध्याने केला अभिषेक-ऐश्वर्यासोबत डान्स, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X