News Flash

करीनाच्या बाळाची पहिली झलक, महिला दिनानिमित्त करीनाचं सरप्राइज

करीनाच्या फोटोला चाहत्यांकडून मोठी पसंती

अभिनेत्री करीना कपूर खानने जागतिक महिला दिनानिमित्तानं तिच्या चाहत्यांना एक खास सरप्राइज दिलंय. 21 फेब्रुवारीला करीनानने ब्रीज कॅण्डी रुग्णालयात एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. करीना दुसऱ्यांदा आई झाल्यापासून तिच्या दुसऱ्या बाळाला पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक होते. तर दुसऱ्या बाळाला मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय सैफिनाने घेतला होता.

अशातच महिला दिनाचं निमित्त साधत करीनाने तिच्या दुसऱ्या बाळासोबतचा फोटो शेअर केलाय. करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकत्याच जन्मलेल्या बाळासोबतचा एक सुंदर फोटो शेअर करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोटो ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट आहे. यात करीनाच्या खांद्यावर बाळ निवांत झोपलेलं दिसतंय. फोटोत बाळाचा चेहरा दिसत नसला तरी करीनाने पहिल्यांदा बाळासोबत हा फोटो शेअर केलाय. “असं काहीही नाही जे महिलांना अशक्य आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा” असं कॅप्शन तिने या फोटोला दिलंय.

करीनाने फोटो शेअर करताच या फोटोवर लाईकचा वर्षाव सुरु झालाय. अवघ्या तासाभराच्या आत दोन लाखांहून अधिक लाईकस् या फोटोला मिळाले आहेत. तर अनेक सेलिब्रिटींनीदेखील तिच्या फोटोला पसंती दिली आहे.

सैफ करीनानं पहिल्या मुलाचं नाव तैमूर का ठेवलेलं? वाचा त्यांच्याच शब्दांत

करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर अनेकांच्या नजरा तिच्याकडे खिळल्या होत्या. करीनाच्या दुसऱ्या बाळाला पाहण्यासाठी चाहते आतुर होते. मात्र सैफिनाने त्यांच्या दुसऱ्या बाळाला मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. सैफ करीनाचा पहिला मुलगा तैमूरची कायमच सोशल मीडियावर चर्चा असते. तैमूरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हाय़रल होताना दिसतात. तर तैमूरला सौशल मीडियावर मिळालेल्या लोकप्रियतेमुळे सैफिनाला अनेकदा ट्रोलही व्हावं लागलं होतं. यामुळे दुसऱ्या मुलाला मीडियासमोर न आणण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 11:29 am

Web Title: kareena kapoor khan shares her first photo with second child on instagram kpw 89
Next Stories
1 ‘माझ्या नवऱ्याची बायको’ने घेतला निरोप, गॅरीच्या पत्नीची पोस्ट चर्चेत
2 नवरा माझा गुणाचा!, पत्नी मीराकडून शाहिदला शाब्बासकी
3 रज्जोचा दबंग लूक!, खाकी वर्दीतील सोनाक्षी सिन्हाचा दमदार अंदाज
Just Now!
X