22 October 2020

News Flash

आयपीएलसाठी तैमूर सज्ज! करीनाने फोटो शेअर करत विचारला प्रश्न

क्रिकेट खेळण्यात तैमूर मग्न

सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर सेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टारकिडची अनेकदा चर्चा रंगत असते. यामध्ये सैफ आणि करीनाचा लाडका लेक तैमूर हा कायमच माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतो. आपल्या बाललीलांमुळे कुटुंबासह असंख्य चाहत्यांना भूरळ घालणारा हा छोटा नवाब सध्या त्याच्या क्रिकेटमुळे चर्चेत आला आहे. एकीकडे आयपीएलचा माहोल आहे, तर दुसरीकडे छोटा तैमूरदेखील क्रिकेट खेळण्यात दंग आहे. त्याचा असाच एक फोटो करीनाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

करीनाने तिच्या इन्स्टाग्रामवर तैमूरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तैमूर क्रिकेट खेळण्यात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे तैमूरच्या हातात असलेली बॅट ही मोठी आहे. मात्र, तरीदेखील तो क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत आहे. हा फोटो शेअर करत, “आयपीएलमध्ये जागा आहे का? मला खेळण्याची संधी हवी आहे”, असं कॅप्शन करीनाने या फोटोला दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

Any place in the IPL? I can play too

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on


दरम्यान, सध्या करीना लाल सिंग चढ्ढा या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. सध्या दिल्लीमध्ये या सिनेमाचं शुटींग सुरु असून तैमूरदेखील करीनासोबत या सेटवर आहे. या सेटवरच तो मज्जा-मस्ती करत असून करीना त्याचे फोटो बऱ्याचदा शेअर करत असते. लाल सिंग चढ्ढा या सिनेमात करीना महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आमिर खान लाल सिंग चढ्ढा ही भूमिका साकारतोय. थ्री इडियट्समध्ये या दोघांची केमिस्ट्री पाहण्यास मिळाली होती. आता लाल सिंग चढ्ढा या सिनेमातही आमिर आणि करीना एकत्र झळकत आहेत. दरम्यान करीना सध्या पाच महिन्यांची गरोदर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 9:26 am

Web Title: kareena kapoor khan son taimur playing cricket photo social media ssj 93
Next Stories
1 बिग बींसाठी प्रसिद्ध गायकानं १७ तास उपाशी राहून गायलं होतं गाणं
2 प्रभासने पूजा हेगडेला वाढदिवशी दिले खास गिफ्ट
3 “तुमच्याकडे फाटलेले कपडे असतील तर सारा अली खानला द्या”, अभिनेत्याचं अजब आवाहन
Just Now!
X