26 September 2020

News Flash

ना धोनी, ना सचिन, ना राहुल… हा आहे करीनाचा आवडता क्रिकेटर

IPL सामन्यांमध्ये अनेकदा दिसून आली करीना

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिने मंगळवारी चित्रपटसृष्टीत २० वर्षे पूर्ण केली. २००० साली तिने रेफ्युजी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं, त्यानंतर तिने अनेक चांगल्या भूमिका केल्या. क्रिकेट जगतासाठीदेखील करीना कपूर हे काही नवीन नाव नाही. काही दिवसांपूर्वीच करीना आणि तिचा नवरा अभिनेता सैफ अली खान यांनी IPL मध्ये एका संघासाठी बोली लावण्याचा विचार बोलून दाखवला होता. तसेच करीनाने IPL च्या काही सामन्यांना हजेरीदेखील लावली होती. एका मनोरंजन विषयाच्या साईटवर बोलताना तिने आपला सर्वात आवडता क्रिकेटपटू कोण? याचे उत्तर दिले.

करीनाचे सासरे हे सुप्रसिद्ध माजी भारतीय कर्णधार मन्सूर अली खान पटौदी होते. त्यामुळे एका कार्यक्रमात तिने, तैमूर आजोबांप्रमाणे क्रिकेटपटू झाला तर आवडेल, असेही म्हटले होते. IPL मध्ये करीना कपूर बऱ्याच वेळा मुंबई इंडियन्सच्या सामन्यांना हजर असल्याचे दिसून आले. पण रोहित शर्मा किंवा सचिन तेंडुलकर हा तिचा आवडता क्रिकेटपटू नाही. अनेक अभिनेत्रींना महेंद्रसिंग धोनी आवडतो, तर नव्या अभिनेत्रींना लोकेश राहुल आवडतो. पण करीनाने या दोघांचीही नावं घेतली नाहीत. करीनाने आपला आवडता क्रिकेटपटू विराट कोहली असल्याचे सांगितले. त्याची मैदानावर वावरण्याची शैली आणि खेळण्याची स्टाईल यामुळे ती त्याची फॅन असल्याचेदेखील मुलाखतीत म्हटले.

“मला तर वाटतं की तो पुढचा सचिन तेंडुलकर झालाच आहे. नाही का? त्याच्यामुळेच आपण एकापाठोपाठ एक अनेक सामने जिंकत आहोत. त्याचे कारण त्याची खेळी हेच आहे”, असेही करिना म्हणाली.

विराट कोहली गेल्या दशकात सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याची खेळी पाहता तो फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर दीर्घकाळ राहील अशी आशा क्रिकेट जाणकार व्यक्त करत आहेत. तसेच, कर्णधार म्हणूनही त्याने जबरदस्त यश मिळवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 11:19 am

Web Title: kareena kapoor khan tells her favourite cricketer virat rohit dhoni rahul vjb 91
Next Stories
1 सुशांतने महिन्याभरात बदलले होते ५० सिमकार्ड्स; नेमकं काय आहे प्रकरण?
2 आषाढी एकादशी निमित्त बिग बींने दिल्या मराठीमध्ये विठ्ठलमय शुभेच्छा
3 अबब… दोन कोटी डॉलर्सचा दावा; ‘त्या’ महिलेविरोधात जस्टिन बिबर न्यायालयात
Just Now!
X