27 November 2020

News Flash

सैफसाठी करिनाचा डान्स

सैफ अली खान सध्या त्याच्या 'हॅप्पी एन्डींग' चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे.

| September 7, 2013 03:29 am

करिना कपूर खान

सैफ अली खान सध्या त्याच्या ‘हॅप्पी एन्डींग’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. याच चित्रपटात करिना एक खास गाणे करणार असल्याचे दिग्दर्शक राज निदिमोरु याने सांगितले आहे.
दिग्दर्शक राज म्हणाला की, आम्ही चित्रपटात करिनावर खास गाणे चित्रीत करण्याचे ठरविले आहे. पण यासाठी अधिक काम करण्याची गरज असून कोणत्या पद्धतीचे गाणे असावे यावर विचार चालू आहेत. तरी अजून कोणताही निश्चित निर्णय घेण्यात आलेला नाही. या गाण्याव्यतिरिक्त करिना चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका करणार आहे. याचे अमेरिकेत चित्रिकरण करण्यात आले आहे.
‘हॅप्पी एन्डींग’च्या चित्रिकरणाचे काम ७५टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असून हा चित्रपट पुढील वर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहे. तसेच, या चित्रपटाची निर्मिती सैफ अली खान आणि दिनेश विजानची इलुमिनटी फिल्म्स संयुकपणे करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 3:29 am

Web Title: kareena kapoor khan to do special song in husband saifs next
Next Stories
1 ‘बॉम्बे वेल्वेट’मध्ये अनुष्काची दुहेरी भूमिका
2 पहा व्हिडिओ : मेणाचा ‘प्रभू देवा’!
3 अनिल कपूरच्या ‘२४’ साठी बॉलिवूड कलाकार पहिल्यांदाच टीव्हीवर
Just Now!
X