25 February 2021

News Flash

करीना रुग्णालयातून परतली घरी; समोर आला व्हिडीओ

पाहा व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई झाली आहे. रविवारी वांद्रे येथील ब्रीज कॅण्डी रुग्णालयात करीनाला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सैफ अली खानने मुलगा झाल्याची गोड बातमी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. आज करीनाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रूग्णालयातून बाहेर पडतानाचा करीनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

करीनाचे हे व्हिडीओ बॉलिवूड फोटोग्राफर वरींदर चावलाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. गाडीत पुढच्या सीटवर करीनाचा मोठा मुलगा तैमुर आणि पती सैफ अली खान बसल्याचे दिसत आहेत. तर पाठी मागच्या सीटवर करीना आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

बाळाचा जन्म झाल्यानंतर सैफ अली खानने यावर प्रतिक्रिया दिली होती. “आम्हाला एक मुलगा झाला आहे. आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आणि निरोगी आहेत. शुभेच्छांसाठी तुम्हा सगळ्यांचे आभार” असे सैफ म्हणाला होता

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

करीना पुन्हा एकदा आई झाल्याने फक्त तिच्या चाहत्यांनीच नव्हे तर सिनेसृष्टीतील अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. करीनाने बाळाला जन्म दिल्यानंतर लगेच बबीता कपूर, रणधीर कपूर आणि करिश्मा कपूर रूग्णालयात पोहोचले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 5:33 pm

Web Title: kareena kapoor khan video with newborn baby get discharged from hospital with saif ali khan and taimur dcp 98 avb 95
Next Stories
1 ‘देसी गर्ल’ गाण्यावर आराध्याने केला अभिषेक-ऐश्वर्यासोबत डान्स, व्हिडीओ व्हायरल
2 ‘तान्हाजी’फेम अभिनेत्याची नवी मालिका; साकारणार ‘ही’ महत्त्वपूर्ण भूमिका
3 “तुझ्या देशात परत जा आणि सामूहिक बलात्कार करून घे..”; प्रियांकाचा खुलासा
Just Now!
X