22 September 2020

News Flash

‘गब्बर’मध्ये करीना साकारणार अक्षयच्या पत्नीची भूमिका

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आगामी 'गब्बर' चित्रपटात केवळ एका गाण्या पुरती दिसणार नसून, ती अक्षय कुमारच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

| April 7, 2014 06:19 am

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आगामी ‘गब्बर’ चित्रपटात केवळ एका गाण्या पुरती दिसणार नसून, ती अक्षय कुमारच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. करिना कपूरच्या जवळच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, ‘गब्बर’मध्ये करिना अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाचा तिचा खून होतो. त्यामुळे अक्षयला सतत तिची आठवण येत राहते, जे चित्रपटात फ्लॅशबॅकच्या स्वरुपात दाखविण्यात आले आहे. बेबोची ही भूमिका आदित्य चोप्राच्या ‘मोहब्बते’ चित्रपटातील एश्वर्या रायच्या भूमिकेशी मिळतीजूळती आहे. ‘महोब्बते’ चित्रपटात प्रमुख स्त्री पात्राचा आत्मा एश्वर्या रायच्या रुपाने संपूर्ण चित्रपटभर फिरताना दाखविण्यात आला आहे. ‘गब्बर’ चित्रपटात आशाचप्रकारची भूमिका करिना साकारत आहे. ‘रामना’ या मूळ तामिळ चित्रपटात सिमरनने साकारलेली भूमिका गब्बर चित्रपटात करिना साकारत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2014 6:19 am

Web Title: kareena kapoor plays akshay kumars wife in gabbar
Next Stories
1 अभिनेत्री वहिदा रेहमान यांचा चित्रपटसृष्टीला रामराम?
2 प्रसिद्ध चलचित्रकार व्ही. के. मूर्ती यांचे निधन
3 रिलेशनशिपसाठी तयार असल्याची परिणिती चोप्राची कबुली
Just Now!
X