News Flash

Video: फोटोग्राफरवर ओरडला तैमूर अन्…, करीना कपूर झाली रागाने लाल

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

(Photo Credit: Viral bhayani video)

बॉलिवूड कलाकारांपेक्षा त्यांची मुलं म्हणजेच स्टारकिड्स सतत चर्चेत असतात. त्यात अभिनेत्री करीना कपूर खानचा लाडका लेक तैमूर नेहमीच कोणत्या कोणत्या कारणांमुळे चर्चेचा विषय ठरतो. सध्या तैमूरचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो फोटोग्राफरवर ओरडतो आणि नंतर असे काही होते ती करीनाला राग येतो.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर करीना आणि तैमूरचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये करीना गाडीतून उतरते आणि फोटोग्राफरला पोज देताना दिसते. दरम्यान मागून तैमूर येतो आणि फोटोग्राफरच्या अंगावर ओरडतो. नंतर तो बिल्डींगच्या काचेच्या गेटवर जाऊन धाडकन आपटतो. ते पाहून करीना तैमूरवर चिडते. सध्या तैमूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर करीना कपूर खान बहिण करिश्मा कपूरची मुलगी समायरा कपूरचा १६वा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिच्या घरी पोहोचली होती. दरम्यान करीनासोबत तैमूर आणि तिची आई बबीता होते. गाडीतून खाली उतरताच करीना फोटोग्राफरला पोज देत असते. तेव्हाच तैमूर फोटोग्राफरवर ओरडतो आणि तेथून पळत जातो. पळत असताना तो बिल्डींगच्या काचेच्या गेटवर जाऊन धाडकन आपटतो. त्यानंतर करीना तैमूरला पकडायला जाते. तैमूरचे अशा प्रकारचे वागणे पाहून करीना चिडते.

दरम्यान करीनाने आकाशी रंगाचा लाँग ड्रेस परिधान केला. त्यावर तोंडाला मास्क लावले आहे. तर तैमूरने गडद निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे. त्यावर त्याने लाल रंगाचे मास्क लावले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 12:13 pm

Web Title: kareena kapoor posed for the photographer taimur ali khan scream at paparazzi avb 95
Next Stories
1 आदित्यला मला चित्रपटात न घेण्याचा देण्यात आला होता सल्ला, राणीने केला खुलासा
2 ‘बॉम्बे बेगम्स’समोर नव्या अडचणी; कायदेशीर कारवाईचा इशारा
3 तापसी पन्नू होणार नव्या घरात शिफ्ट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Just Now!
X