01 March 2021

News Flash

करिना व सैफमध्ये भांडण झाल्यावर कोण मागतं माफी? जाणून घ्या

करिनाने चॅटशोमध्ये खुलासा केला आहे.

बॉलिवूडमध्ये अतिशय लोकप्रिय कपल म्हणून अभिनेत्री करिना कपूर खान आणि सैफ अली खानकडे पाहिले जाते. करिना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ सतत चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकताच करिनाने चॅट शोमध्ये सैफ आणि तिच्या विषयी वक्तव्य केले.

करिनाने तिचा चॅट शो ‘वॉट वुमन वॉन्ट’मध्ये पाहुणा म्हणून अभिनेता कुणाल खेमूला बोलावले होते. त्या दोघांनामध्ये मजा मस्ती सुरु होती. दरम्यान करिना कुणालला विचारते त्याचे आणि पत्नी सोहाचे भांडण झाले की सर्वात पहिले सॉरी कोण बोलतं? त्यावर कुणालने तो स्वत: सर्वात पहिले माफी मागत असल्याचे सांगितले. सोहाच्या डिक्शनरी सॉरी हा शब्दच नाही असे कुणाल बोलतो.

दरम्यान कुणालचे बोलणे ऐकून करिना देखील म्हणते आमच्यामध्ये भांडण झालं की सैफ पहिले माफी मागतो. ‘सैफ पण पहिले माफी मागतो. मला असे वाटते की सर्वात पहिले पुरुषच माफी मागतात. नेहमी तेच चुका करतात असे मला वाटते. त्यामुळे ते पटकन माफी मागतात’ हसतहसत करिना म्हणते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2021 7:31 pm

Web Title: kareena kapoor reacts on fights with saif ali khan says he is the one who always says avb 95
Next Stories
1 सुशांतच्या वाढदिवसानिमित्त अंकिताने शेअर केला व्हिडीओ
2 Bigg Boss 14: निक्की तांबोळीने देवोलीनाची उडवली खिल्ली
3 ‘आई कुठे काय करते’ मालिकेत धक्कादायक वळण
Just Now!
X