अभिनेत्री करिना कपूर कायम तिच्या पर्सनल किंवा प्रोफेशनल लाईफविषयी उघडपणे बोलताना दिसते. सध्या तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफविषयीच्या सर्वाधिक चर्चा रंगल्या आहेत. तिचा लाडक्या लेकाची तैमुरची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. यातून प्रसारमाध्यमांमध्ये कधी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो.तर काही वेळा टीकेचा भडीमार. अशातच काही नेटकऱ्यांनी तैमुरवर टीका केल्याचं पाहायला मिळत आहे. यात एका नेटकऱ्याने तैमुरला कुपोषित संबोधलं असून करिनाने मात्र या नेटकऱ्यांला चांगलच प्रत्युत्तर दिलं आहे.

तैमुरच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे सैफ-करिनाला त्याच्या सुरक्षेची चिंता सतावत आहे. यासाठी त्यांनी अनेक वेळा तैमुरला सामान्य मुलांप्रमाणे जगू द्या अशी विनंतीही केली आहे. मात्र त्याच्या चर्चा आणि लोकप्रियता काही केल्या कमी व्हायचं नाव नाही. तैमुरचा शाळेतला पहिला दिवस असो किंवा त्याने केलेली नवीन हेअरकट. त्याच्या चर्चा होणारचं. यातून मग टीका-टिप्पणी आणि कौतुकांचा वर्षाव या दोन्ही गोष्टी आल्याचं. मात्र या साऱ्यावर करिना कायम तिचं मत मांडत असते.विशेष म्हणजे या गोष्टींकडे करिना सकारात्मकतेने पाहतांना दिसते. नुकतीच करिनाने एका चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात ट्विटरवरुन तैमुरवर टीका करणाऱ्यांना करिनाने हटके उत्तर दिलं.

करिनाजी तुम्ही तैमुरला काही खायला देत नाहीत का ? त्याच्याकडे पाहिल्यानंतर तो कुपोषित असल्यासारखं वाटतं असे ट्विट एका नेटकऱ्याने केलं होतं. नेटकऱ्याच्या या प्रश्नावर करिनाने तिच्या हटके अंदाजात उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. तैमुर कमी खातोय ? नाही, नाही अजिबात नाही. उलटपक्षी तैमुर सध्या प्रमाणापेक्षा जास्त जेवतो. त्यामुळे त्याचं वजनसुद्धा वाढल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी तैमुरवर टीका करणाऱ्यांवर करिनाने नाराजी व्यक्त केली होती.मात्र यावेळी करिनाने नेटकऱ्यांनी केलेल्या टीकेवर नाराजी व्यक्त न करता हसतखेळत उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.